मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘बीएलओ’ करणार मदत

·        जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती
·        अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
·        सर्च इंजिनद्वारेही मतदान केंद्राविषयी माहिती मिळणार
वाशिम, दि. २४ : दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वा. या कालावधीत अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७३६ मतदार २९ मतदान केंद्रांवर आपला हक्क बजावणार आहेत. पात्र मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्च इंजिनद्वारेही ऑनलाईन पध्दतीने मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे.
वाशिम तालुक्यातील सुधीर चौरे (भ्र.क्र. ९८८१७५८८८५), ए. जे. घुगे (भ्र.क्र. ९८५०८८०८२०), रमेश आरु (भ्र.क्र. ९४२२०३६१४०), प्रशांत बोरकर (भ्र.क्र. ९७८०१११००१), अनिल काठेकर (भ्र.क्र. ९४२१८३१९८७), आर. एन. बोरकर (भ्र.क्र. ९४२०८३८९५५) यांची वाशिम व व्ही. डी. ढवळे (भ्र.क्र. ८८८८२९८४००) यांची अनसिंग मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यामध्ये विजय पांढरे (भ्र.क्र. ७७९८०६२७०२) यांची जऊळका, विजय महाकाळ (भ्र.क्र. ९५२७५२१५६७) व  अवि किरण काटेकर (भ्र.क्र. ९७६३९६२९७०) यांची मालेगाव, किशोर देशमुख (भ्र.क्र. ९९६०६२३३८४) यांची शिरपूर येथील मतदान केंद्रांवर बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रिसोड तालुक्यामध्ये बी. पी. पवार (भ्र.क्र. ९४२१४६७२७२), यांची केनवड, जी. व्ही. शिनगारे (भ्र.क्र. ९४२०१४९१३५) यांची  मोप, के. एम. वानरे (भ्र.क्र. ९५६१९१५१६१) व एस. एम. धांडे (भ्र.क्र. ९४२२२३६५२५) यांची रिसोड, एस. जि. जोशी (भ्र.क्र. ९९७५२५४७५०) यांची रिठद मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगरूळपीर तालुक्यामध्ये आर. पी. इंगळे (भ्र.क्र. ९४२२१८९३९७) यांची धानोरा खु., अमोल शेंडे (भ्र.क्र. ९०९६९८४०५२) व पी. बी. नागे (भ्र.क्र. ९१७५०१९९२२) यांची मंगरूळपीर, अब्दुल रईस (भ्र.क्र. ९५२७८२२३०३) यांची शेलू खुर्द मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. मानोरा तालुक्यात वेणूताई कापसे यांची शेंदूरजना, श्री. नवघरे (भ्र.क्र. ७५८८७६२३९७) यांची पोहरादेवी, के. व्ही. कटकतलवारे (भ्र.क्र. ९१६८४९५७३०) व संध्या मारोतराव पट्टेवार (भ्र.क्र. ८२७५८३९०४४) यांची मानोरा मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. कारंजा तालुक्यात दीपक देशमुख (भ्र.क्र. ९९२३६३३४०३), चेतन क्षीरसागर (भ्र.क्र. ९७६४३९५९२०), अमोल नागे (भ्र.क्र. ९६५७०५५५६१), जी. यु. परळकर (भ्र.क्र. ९९२३०६२७८०) यांची कारंजा व एच. आर. भगत (भ्र.क्र. ७५०७७०७५७३) यांची कामरगाव येथे बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तहसीलदार कार्यालयात मतदार सहाय्यता कक्ष
तहसील कार्यालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या मतदार सहाय्यता कक्षामध्ये प्रत्येक्ष जाऊन अथवा दूरध्वनीद्वारे पदवीधर मतदारांना मतदान केंद्रविषयक माहिती उपलब्ध करून घेता येणार आहे. त्याकरिता मतदार सहाय्यता केंद्राचे व तेथे नियुक्त अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. वाशिम - ०७२५२-२३२००८, दीपक दंडे (भ्र.क्र. ९९२१३९७७४८), अशोक डोंगरे (भ्र.क्र. ९६८९७५१४२४);  मालेगाव - ०७२५३-२३१३७३, सुधीर नागपूरकर (भ्र. क्र. ९६०४९५९५१३), एन. एम. इंगळे (भ्र. क्र. ९७६४३२३२६०); रिसोड - ०७२५१-२२२३१६, श्री. निगोते (भ्र. क्र. ९६७३५१७४४५), ए. एस. मांदळे (भ्र. क्र. ९४२०१००५८२); मंगरूळपीर – (०७२५३-२३०२२८), एम. आर. पांडे (भ्र. क्र. ९९२३५७०८८०), एस. एम. अली (भ्र. क्र. ७८७५००७७९८); कारंजा- ०७२५६-२२२१७०, दामोधर पाचरणे (भ्र. क्र. ९८२३३०३९९२), श्री. क्षीरसागर (भ्र. क्र. ९४२१७५२९७८), मानोरा- ०७२५३-२३३२४६, श्री. खाटिक (भ्र. क्र. ९९२१४४५०५८), संदीप आडे (भ्र. क्र. ९९२३०९००७५).
पदवीधर मतदारांच्या मदतीसाठी ‘सर्चइंजिन’

वाशिम जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, याकरिता उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक, पत्ता व मतदान केंद्राची माहिती www.washim.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे आडनाव व नाव टाईप केल्यानंतर पात्र पदवीधर मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, नाव, पत्ता व मतदान केंद्राची माहिती मिळेल. 

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे