Posts

Showing posts from March, 2018

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

·          १७ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींवर होणार सुनावणी वाशिम ,   दि .   ३१   :   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी   जिल्हास्तरावर   जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही   दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील   जिल्हास्तरीय   लोकशाही   दिन   सोमवार , दि. २ एप्रिल २०१८ दुपारी १ वाजता   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे   जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी दि. १७ मार्च २०१८ पर्यंत तक्रारी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दि. १७ मार्चपर्यंत प्राप्त तक्रारींवरच यावेळी सुनावणी होईल. ज्यांच्या तक्रारी यापूर्वी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल आहेत , मात्र त्या निकाली निघालेल्या नाहीत , अशा व्यक्तींनीही यावेळी उपस्थित रहावे. दि. २ एप्रिल रोजीच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील सुनावणीसाठी त्याचदिवशी कोणतीही तक्रार दाखल करता येणार नाही , असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

जिल्ह्यात १६ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम ,   दि .   ३१   :     जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी दि. ०२ एप्रिल ते दि. १६ एप्रिल २०१८ या कालावधीत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार   प्रतिबंधात्मक   आदेश   लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या कालावधीत शस्त्रे ,   सोटे ,   तलवारी ,   भाले ,   दंडे ,   बंदुका ,   सुरे ,   लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे ,   कोणताही   दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे ,   दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे ,   जमा करणे किंवा तयार करणे ,    व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे ,   वाद्य वाजविणे , किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा ,   भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा ,   धार्मिकविधी ,   सामा जिक सण ,   लग्न सोहळे यांना हा   आदेश   लागू नाही ,   असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवि

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

Image
·          जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन ·          महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजन ·          स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ·          विविध उत्पादनांचे ७० स्टॉल;विविध वस्तू एकाच छताखाली खरेदीची संधी     वाशिम , दि . ३० : जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू तसेच शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने वाशिम येथे या वस्तूंचा मॉल उभारण्यात येणार आहे. याकरिता ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले. जुनी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या प्रदर्शनीचे आयोजन करण्य