जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
· १७ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींवर होणार सुनावणी
वाशिम, दि. ३१ : प्रत्येक
महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक
तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार,
दि. २ एप्रिल २०१८ दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
या जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी दि. १७ मार्च २०१८ पर्यंत
तक्रारी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दि. १७ मार्चपर्यंत
प्राप्त तक्रारींवरच यावेळी सुनावणी होईल. ज्यांच्या तक्रारी यापूर्वी
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल आहेत, मात्र त्या निकाली निघालेल्या नाहीत, अशा
व्यक्तींनीही यावेळी उपस्थित रहावे. दि. २ एप्रिल रोजीच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील
सुनावणीसाठी त्याचदिवशी कोणतीही तक्रार दाखल करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Comments
Post a Comment