Posts

Showing posts from August, 2023

वाहतुक नियमबाबत जनजागृती :विधी सेवा प्राधिकरणचा पुढाकार

Image
वाहतुक नियमबाबत जनजागृती विधी सेवा प्राधिकरणचा पुढाकार वाशिम दि.30(जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिमच्या वतीने  नागरिकांना वाहतुकींच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी आज 30 ऑगस्ट रोजी वाशिम शहरातील बसस्थानक परिसर,बसस्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पाटणी चौकात जनजागृती करण्यात आली.ही जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजय टेकवाणी यांच्या मार्गदर्शनात विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी, शाहीर उत्तम इंगोले,मनीषा दाभाडे व शीतल बन्सोड यांनी केली.शाहीर उत्तम इंगोले यांनी जनजागृतीपर गीत गायन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विधी स्वयंसेवकांनी हस्तपत्रके वितरित करून वाहतूक नियमांबाबतची माहिती दिली.

१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत "आयुष्मान भव" मोहीम जिल्हयातील सर्व आबालवृध्दांची होणार आरोग्य तपासणी मोाहिमेचा लाभ घ्यावा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत  "आयुष्मान भव" मोहीम जिल्हयातील सर्व आबालवृध्दांची होणार आरोग्य तपासणी माहिमेचा लाभ घ्यावा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन        वाशिम, दि. 30 (जिमाका)  :   केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर 2023 या कालावधीत जिल्हयात “ आयुष्मान भव ” ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व वयोगटातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी या मोहिमेअंतर्गत सर्व आबालवृद्धांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येणार आहे. आयुष्मान आपल्या दारी ३.० या मोहिमेमध्ये जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड याबाबत जनजागृती आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळावा अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग,

महाराष्ट्र भूषण पुरस्कार : 31 ऑगस्टपर्यंत वैयक्तिक माहिती मागविली

Image
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 31 ऑगस्टपर्यंत वैयक्तिक माहिती मागविली        वाशिम, दि. 30 (जिमाका)  :   महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. 25 लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या आणि मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मानित करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.            पुरस्कारासाठी पात्रता व निकष - संबंधित व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाव्दारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास किंवा क्रीडा अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथील करण्यात येईल. त्या व्यक्तीचे राज्यात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे. पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.     

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा: राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा सत्कार

Image
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा सत्कार        वाशिम, दि. 30 (जिमाका)  :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात ज्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा प्राविण्य प्राप्त केले, अशा खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहीती अधिकारी विवेक खडसे होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, प्राचार्य संजय शिंदे, प्राचार्य संतोष राठोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे आणि संतोष फुफाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.            श्री. खडसे म

शेतकरी दिन उत्साहात साजरा :उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
शेतकरी दिन उत्साहात साजरा   उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाशिम दि.30 (जिमाका) पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज आत्मा कार्यालय येथे शेतकरी दिन साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते डॉ.विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.चातरमल,स्मार्टचे नोडल अधिकारी श्री.वाळके,कृषी उपसंचालक श्री.धनुडे,पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद प्रदेश सरचिटणीस रूपाली देशमुख , जिल्हाध्यक्ष जगदीश देशमुख व उपाध्यक्ष अंजली पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.                जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी शेतकऱ्यांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देऊन चिया उत्पादन व विक्री व्यवस्थेसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा कंपनी सोबत करार करण्याबाबत मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांशी चिया उत्पादन व विक्रीविषयी प्राथमिक चर्चा केली.                    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी चिया विपणनबाबत,खरीप पीक

सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम एमसीईडी व डीआयसीचा पुढाकार

Image
सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम एमसीईडी व डीआयसीचा पुढाकार वाशिम, दि. 29 (जिमाका)  :   महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, वाशिमच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, वाशिम पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत मोफत स्वरूपाच्या अनुक्रमे “सोलर पॅनल इंस्टॉलेशन” व मेंटेनन्स व इलेक्ट्रॉनिक्स घरगुती उपकरण दुरुस्ती आणि विशेष घटक योजनेअंतर्गत " अगस्थती निर्मिती" वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, राणा एज्युकेशन, नगर परिषद कॉम्पलेक्स, अकोला नाका, वाशिम येथे 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.            सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार व रोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद, वाशीम यांच्याकडे कर्जप्रकरणे ऑनलाईन भरून देण्यात येत आहेत. तरी निवड झालेल्या लाभार्थ्या

खरीप हंगाम 2023 : पिक स्पर्धा योजना 31 ऑगस्ट अंतिम मुदत

Image
खरीप हंगाम 2023 : पिक स्पर्धा योजना 31 ऑगस्ट अंतिम मुदत वाशिम, दि. 29 (जिमाका)  :   पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास  त्यांचे  मनोबल  वाढून  आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल ,  हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.  कृषी विभागाच्या वतीने  खरीप हंगाम सन २०२३ मध्ये  सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी  भात ,  ज्वारी ,  बाजरी ,  मका ,  नाचणी, तूर ,  मूग ,  उडीद ,  सोयाबीन ,  भुईमुग व सुर्यफुल  या  11  पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.         पिक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी -  पिक स्पर्धेसाठी भात ,  ज्वारी ,  बाजरी ,  मका ,  नाचणी ,  तूर ,  सोयाबीन ,  भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल

वाहन चालकांनी आरोग्याची काळजीव प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन वाहन चालवावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर

Image
वाहन चालकांनी आरोग्याची काळजी व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन वाहन चालवावे             जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर          वाशिम, दि. 29 (जिमाका) :  अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाहन चालकांसाठी करण्यात आलेले नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे. वाहन चालकाच्या हाती वाहनात बसलेल्या केवळ प्रवाशांचा जीवच असतो असे नाही तर प्रवाशांच्या कुटूंबातील अनेक सदस्य देखील त्यांच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे वाहन चालकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेवून व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन वाहन चालवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.             आज 29 ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वाशिम येथे वाहन चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराच्या उदघाटक म्हणून श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर,माँ गंगा हॉस्पीटलचे संचालक डॉ.हरीष बाहेती,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 5 वी प्रवेशास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Image
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 5 वी प्रवेशास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ        वाशिम, दि. 28 (जिमाका)  :   प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुन्हा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी   www.navodaya.gov.in  किंवा  www .cbseitms.rcil.gov.in/nvs  या संकेतस्थळावर भेट देवून विनामुल्य अर्ज करु शकतात.           नोंदणीकृत उमेदवारांकरीता ऑनलाईन अर्जामध्ये बदल करण्यासाठी दूरुस्ती खिडकी शेवटच्या तारखेनंतर दोन दिवस उघडण्यात येणार आहे. ज्यामध्ये लिंग, प्रवर्ग, क्षेत्र, अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम या क्षेत्रामध्ये दूरुस्ती करता येईल. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले आहे. *******

लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सुचविल्या उपाययोजना

Image
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सुचविल्या उपाययोजना        वाशिम, दि. 28 (जिमाका)  :   जिल्हयात एकूण 1 लक्ष 68 हजार 91 गोवर्गीय पशुधन आहे. आजपर्यंत 1 लक्ष 59 हजार 404 जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण पुर्ण झाले आहे. तरी देखील वाशिम तालुक्यात 4, मालेगांव तालुक्यात 1, मंगरुळपीर तालुक्यात 1 व रिसोड तालुक्यात 1 असे एकूण 7 गोवंशीय जनावरांचा या लम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे. याकरीता पशुसंवर्धन विभागाकडून या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.            जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरीत संपर्क साधावा. बाधित जनावरे कळपातील निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था देखील वेगळी करण्यात यावी. बाधित जनावरांची वाहतूक करु नये. बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करण्यात यावे. बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये. मृत जनावरांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी. या रोगाचा प्रसार हा मुख्यत्वे बाहय किटकाव्दारे होत असल्याने जनावरांचे गोठ

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन        वाशिम, दि. 28 (जिमाका)  :   महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरीता कर्ज सहाय्यक उपकरणे ही योजना राबविण्यात येते. ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पात्र व्यक्तींकरीता पुढील योजना या महामंडळाच्या वतीने कार्यान्वीत करण्यात आल्या आहे.            दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना -  राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, फरीदाबाद यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींकरीता दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विविध लघु उद्योगाकरीता ५० हजार रुपये ते ५ लक्ष रुपये अर्थसहाय्य वार्षिक व्याजदर ५ टक्के ते ९ टक्के दराने महामंडळाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.            वैयक्तिक थेट कर्ज योजना -  या महामंडळाच्या वतीने ५० हजार रुपयापर्यंत कुटीर उद्योगाकरीता वैयक्तीक थेट कर्ज योजना राबविण्यात येते. यासाठी २ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.            महाशरद वेब पोर्टल -  दिव्यांग

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज, अनुदान, प्रशिक्षणव उच्च शैक्षणिक कर्ज योजनांचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आवाहन

Image
महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व उच्च शैक्षणिक कर्ज योजनांचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आवाहन        वाशिम, दि. 28 (जिमाका)  :   महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध व अस्वच्छ सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींकरीता कर्ज/अनुदान/प्रशिक्षण व उच्च शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येतात. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती/नवबौद्ध आणि अस्वच्छ सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या पात्र व्यक्तींकरीता पुढील नमुद केलेल्या योजना कार्यान्वीत आहे.           विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना -  या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींसाठी विविध कुटीर उद्योगाकरीता ५० हजार रुपयापर्यंत बँकामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये महामंडळामार्फत १० हजार अनुदान दिल्या जाते व उर्वरित रक्कम बँक कर्ज स्वरुपात असते. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याकरीता महामंडळास ९५ कर्ज प्रकरणांचे भौतिक उद्दीष्ट देण्यात आले आहे.            बिजभांडवल योजना -  या

खाजगी रुग्णालयांनी क्षयरुग्णांची माहिती व नोंदणी आरोग्य विभागास कळवावी

Image
खाजगी रुग्णालयांनी क्षयरुग्णांची माहिती व नोंदणी आरोग्य विभागास कळवावी        वाशिम, दि. 28 (जिमाका)  :   क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जगात दर दोन मिनिटात क्षयरोग प्रतिबंध औषधी न घेणारे तीन क्षयरुग्ण दगावत आहे. या रोगाचा फैलाव टाळणे व प्रत्येक क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळा, औषध विक्रेते आणि वैद्यकीय व्यावसायीकांनी आरोग्य खात्याकडे त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानानुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभनकर यांनी कळविले आहे.           भारतीय राजपत्रानुसार १९ मार्च २०१८ च्या खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, प्रयोगशाळा व खाजगी औषध विक्रेत्यांनी त्यांच्याकडे निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे. परंतू काही खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, प्रयोगशाळा आणि औषध विक्रेते त्यांच्याकडे निदान होणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने व या रोगाची गंभीरता ओळखून जर निदान होऊनही क्षयरुग्णांची नावे ज

वाशीमच्या नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रात रोगनिदान शिबीर अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

Image
वाशीमच्या नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रात रोगनिदान शिबीर अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ   वाशिम दि.26 (जिमाका) वाशिम येथील बागवानपुरा येथील नागरी आरोग्यवर्धीनी उपकेंद्र येथे आज 26 ऑगस्ट रोजी मोफत रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. परभणकर,वैद्यकीय अधिकारी डॉ रुईकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा जाधव,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.            शिबिरात हृदयरोग,मधुमेह, रक्तदाब,मेंदूचे विकार गुप्तरोग, फुफ्फुसाचे आजार,किडणी आजार, थॉयरॉईड,त्वचारोग,कान,नाक,घसा, क्षयरोग,कुष्ठरोग,नत्ररोग,स्त्री रोग, लहान मुलांचे आजार  ईत्यादिवर निदान व उपचार करण्यात आले.               या शिबिराचा लाभ शेकडो रूग्णांनी घेतला.यावेळी फिरत्या डिजीटल एक्स - रे वाहनाने संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात आली.क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी 53 क्षयरूग्ण संशयितांचे एक्स रे

पिक नुकसान सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनो, भुलथापांना बळी पडू नका :कृषी विभागाचे आवाहन

Image
पिक नुकसान सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनो, भुलथापांना बळी पडू नका कृषी विभागाचे आवाहन         वाशिम, दि. 25 (जिमाका)  :  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत १ लाख ९८ हजार ५१२ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. १३ हजार ४५८ शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पिक नुकसानीबाबत पुर्व सुचना दिल्या आहे. प्राप्त तक्रारीनुसार शेतकऱ्यांच्या तक्रारीचे सर्वेक्षण करणे चालु आहे. जिल्हयातील सहा तालुक्यातून शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सुचना प्राप्त होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी काही शेतकरी आधी माझे सर्वेक्षण करा, असा आग्रह धरत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राप्त पिक नुकसान सुचनांचे सर्वेक्षण विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषि विभागामार्फत नि:शुल्क करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांना व भुलथापांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीस सर्वेक्षण शुल्क अथवा कोणत्याही कारणास्तव पैसे देवू नये. कोणीही पैशाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधीत गावचे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संबंधीताविरुध्द तक्रार करा

विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती पाण्डेय यांची शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

Image
विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती पाण्डेय यांची शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट  वाशिम दि.23 (जिमाका) विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज 23 ऑगस्ट रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, तहसीलदार रवि राठोड व तालुका आरोग्य अधिकारी तथा शेलुबाजारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती            भेटीदरम्यान डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी आरोग्य केंद्रातील सर्व कक्ष व वार्डची पाहणी केली.तसेच तेथील कामकाजाची तपासणी केली.औषधी भांडारची पाहणी करून कोणकोणत्या प्रकारची औषधे भांडार शाखेत उपलब्ध आहेत तसेच ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का याची माहिती घेतली.सलाई,सर्पदंश झाल्यास इंजेक्शनची व्यवस्था व कुत्रा चावल्यास रॅबिज प्रतिबंधक इंजेक्शन उपलब्धतेबाबतची माहिती त्यांनी घेतली.        आरोग्य विभागाचे कामकाज व उपलब्ध औष

विकास कामे वेळेत पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय कारंजा येथे विकास कामांचा आढावा

Image
विकास कामे वेळेत पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा          विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय  कारंजा येथे विकास कामांचा आढावा वाशिम दि.23 (जिमाका)  विविध योजनांमधून करण्यात येणारी  विकास कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करतांना लोककल्याणकारी योजनांची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करा.असे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय यांनी दिले.                     आज 23 ऑगस्ट रोजी कारंजा पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय यंत्रणांकडून विविध योजनांचा आढावा घेतांना आयोजित सभेत त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, उपजिल्हाधिकारी(रोहयो) कैलास देवरे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे,तहसिलदार कुणाल झाल्टे व गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.                  सभेत विभागीय आयुक्त डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण

वसतीगृहाच्या मार्गदर्शिकेची अंमलबजावणी

Image
वसतीगृहाच्या मार्गदर्शिकेची अंमलबजावणी  वाशिम दि.22 (जिमाका) मागासवर्गीय मुला मुलींच्या शासकीय वस्तीगृहासाठी आयुक्त, समाज कल्याण यांनी उच्चस्तरीय समिती गठित करून शासकीय वसतीगृह योजना मार्गदर्शिका तयार केली आहे. या मार्गदर्शिकेची अंमलबजावणी राज्यातील वसतीगृहात करण्याच्या सूचना दिल्या आहे. वसतीगृहातील नियमावली तसेच विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून वसतीगृहाच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात एकूण 22 नियमासह हमीपत्र नमूद केले आहे.            या मार्गदर्शिकेच्या अनुषंगाने वसतीगृहातील प्रवेशित व्यवस्थापनाने कोणतेही नवीन नियम तयार केलेले नाही.शासकीय वसतीगृहात लावण्यात आलेले नियम हे आयुक्तालयाने ठरवून दिलेल्या नियमांचेच पालन केले जात आहे.वसतीगृहस्तरावर कोणतेही नियम बनविले जात नसल्याची माहिती समाज कल्याणच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून " शासन आपल्या दारी " तयारीचा आढावा

Image
जिल्हाधिकाऱ्यांकडून " शासन आपल्या दारी " तयारीचा आढावा  वाशिम दि 22 (जिमाका) " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत वाशीम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले.सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,मोहन जोशी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, राजेश सोनखासकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे व दिगंबर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.                    जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यांनी " शासन आपल्या द

बँकांनी कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नये जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस बँकांकडून कर्ज प्रकरणांचा आढावा

Image
बँकांनी कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नये             जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  बँकांकडून कर्ज प्रकरणांचा आढावा  वाशिम दि.21 (जिमाका) बँकांना पीक कर्ज वाटपासह अन्य शासकीय योजनांच्या प्रकरणात दिलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. कर्ज वाटप करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अर्जदाराकडून वेळेत करावी.कर्ज प्रकरणे मंजूर करण्याची बँकांनी तारीख निश्चित करून कोणतेही कर्ज प्रकरण प्रलंबित राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.             जिल्ह्यातील बँकांचा कर्ज वाटपाचा आढावा नुकत्याच आयोजित सभेत जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या.सभेला रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नागपूर कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक हितेश गणवीर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.            श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना करण्या

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान ..रतन टाटा उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस

Image
उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान रतन टाटा उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ - राज्यपाल रमेश बैस  मुंबई, दि २० :-  रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत.रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील,ऑटोमोबाईल्स,आयटी, विमानबांधणी,आदरातिथ्य अशा  वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले.ते उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे,असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.  उद्योग विभागाच्यावतीने देण्यात येणारे उद्योगरत्न', 'उद्योग मित्र', 'उद्योगिनी' आणि 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉल येथे प्रदान करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन श्री बैस बोलत होते.मुख्यमंत्री ए

*जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांची विविध संस्थांना भेट व महिला बाल भवन बांधकामाची पाहणी*

Image
*जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांची विविध संस्थांना भेट व महिला बाल भवन बांधकामाची पाहणी* वाशिम दि.20 (जिमाका) जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज 20 ऑगस्ट रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यरत दिशा मुलींचे निरीक्षणगृह /बालगृह,बाल कल्याण समिती,सखी वन स्टॉप सेंटर आणि महिला व बाल भवनाच्या बांधकामास  सदिच्छा भेट दिली.           जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी,बाल कल्याण समिती अध्यक्षा डॉ.अल्का मकासरे,सदस्या डॉ.मंजुषा जांभरूणकर,परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे,गजानन पडघन,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी जिनसाजी चौधरी,संरक्षण अधिकारी भगवान ढोले,अधीक्षक गोपाल मोरे यावेळी उपस्थित होते.            भेटी दरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी बालगृहातील प्रवेशित मुलींशी संवाद साधला.मुलींना चांगले शिक्षण,सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण,क्रीडाक्षेत्राकडे करीअरच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.           यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मुलींना खेळामध्ये आव

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 15 मुले हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना

Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 15 मुले हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना  वाशिम दि.20 (जिमाका) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 18 वर्षाआतील 15 मुलांना 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रियेसाठी अपोलो हॉस्पिटल मुंबईकडे रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या बालकांना पुष्प दिले.                 जिल्हा रुग्णालय,वाशिम कार्यालयामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी शाळा व अंगणवाडीमध्ये वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी केली जाते.जिल्हा शासकीय रुग्णालय, वाशिम येथे 11 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या 2 D Echo संदर्भ सेवा शिबिरामध्ये 33 मुलांच्या हृदयाची तपासणी केली असता 15 मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वाशिम अंतर्गत त्यांच्यावर मोफत हृदयशस्त्रक्रीया व उपचार करण्यासाठी नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलला पाठविण्यात आले.            या मुलांना मुंबईकडे रवाना करतेवेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचेसह जिल्हा शल्यचिकि

आयआयटी बॉम्बे मिशन पोषण संयोजक व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम आयोजित "माता शिशु पोषण प्रशिक्षण"

Image
आयआयटी बॉम्बे मिशन पोषण संयोजक व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम आयोजित   "माता शिशु पोषण प्रशिक्षण" वाशिम दि .19 (जिमाका) माता शिशु पोषण प्रशिक्षण,जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी श्रीमती.बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर,आयआयटी बॉम्बे स्टेट ट्रेनर श्रीमती रुपल व श्री. देवाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.          दोन दोन दिवसीय प्रशिक्षण हे तीन टप्प्यात पार पडणार आहे.  परीक्षेच्या आधारे जिल्ह्यातील  निवडक आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्यसेवक व सेविका, परिचारिका,वैद्यकीय अधिकारी व सामुदायिक आरोग्य अधिकारी अशा एकूण 260 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन मास्टर ट्रेनर बनविण्याचा मानस आयआयटी बॉम्बे मिशन पोषण संयोजक व आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम यांनी हाती घेतला आहे.               या प्रशिक्षणात जिल्ह्यातील जन्मतः कमी वजनाचे बालक, व

विद्यार्थ्यानी शेती विज्ञानाची कास धरुन कृषि उदयोजकता जोपासावी बुवनेश्वरी एस.

Image
विद्यार्थ्यानी शेती विज्ञानाची कास धरुन कृषि उदयोजकता जोपासावी                             बुवनेश्वरी एस. वाशिम दि.18(जिमाका) भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.आजचे युग हे विज्ञानाचे आहे.आज केवळ शेती करूनच चालणार नाही तर शेतीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे.विद्यार्थ्यांनी देखील शेती विज्ञान कास धरून कृषी उद्योजकता जोपासावी.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले.               आज 18 ऑगस्ट रोजी  कृषी विज्ञान केंद्र करडा येथे जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शालेय विदयार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची सुरुवात व कृषि संस्कृती दालन, नैसर्गिक व सेंद्रिय निविष्ठा निर्मिती केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या संस्थेचे विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त चैतन्य देशमुख होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शहा,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्म