रस्ता सुरक्षा कार्यक्रम :नेत्र तपासणी व चष्मेसाठी शिबीर



रस्ता सुरक्षा कार्यक्रम

नेत्र तपासणी व चष्मेसाठी शिबीर

          वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयातील प्रवासी बस वाहन चालक व जड वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यावरील अपघातांचे  प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे देण्याचे तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व वाहन चालकांनी नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. वाहन चालकांनी स्वत:चे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स स्वत:जवळ ठेवावे.

          वाशिम तालुका - 10 व 11 ऑगस्ट 2023 रोजी नेत्र रुग्ण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत. मंगरुळपीर तालुका - 25 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय, मंगरुळपीर येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत. मालेगांव तालुका - 22 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय मालेगांव येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. कारंजा तालुका - 23 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय, कारंजा येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि रिसोड तालुक्यात 24 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे