जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : रिसोडच्या महाविद्यालयात मतदार नोंदणीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : रिसोडच्या महाविद्यालयात मतदार नोंदणीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वाशिम दि.४ (जिमाका) कोणताही पात्र व्यक्ती हा मतदानापासून वंचीत राहणार नाही,यासाठी त्यांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे.याच अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रिसोड येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविदयालय येथे आज ४ ऑगस्ट रोजी राज्यशास्त्र विभाग,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त वतीने महसूल सप्ताहाअंतर्गत युवा संवाद नवं मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस होत्या.  
               कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी डॉ अपुर्वा बासुर, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर व प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           महाविद्यालयातील नव मतदार असलेले विद्यार्थी यांना मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदार नोंदणी करणे किती आवश्यक आहे याचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
               मतदार जनजागृतीबाबत रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली.या स्पर्धेमध्ये प्रथम,व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विदयार्थ्याना तसेच घरोघरी जाऊन मतदारांचा सर्व्हे करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदार नोंदणीचे काम १०० टक्के केले त्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे