सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम एमसीईडी व डीआयसीचा पुढाकार




सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी

स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम

एमसीईडी व डीआयसीचा पुढाकार

वाशिम, दि. 29 (जिमाका) :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, वाशिमच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, वाशिम पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत मोफत स्वरूपाच्या अनुक्रमे “सोलर पॅनल इंस्टॉलेशन” व मेंटेनन्स व इलेक्ट्रॉनिक्स घरगुती उपकरण दुरुस्ती आणि विशेष घटक योजनेअंतर्गत " अगस्थती निर्मिती" वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, राणा एज्युकेशन, नगर परिषद कॉम्पलेक्स, अकोला नाका, वाशिम येथे 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
           सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार व रोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद, वाशीम यांच्याकडे कर्जप्रकरणे ऑनलाईन भरून देण्यात येत आहेत. तरी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी योग्य प्रकारे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या संपर्कातील लोकांना माहिती दयावी. हा प्रशिक्षण कालावधी १ महिन्याचा आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येत असून इच्छुकांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, जिल्हा कार्यालय, काळे कॉम्प्लेक्स, जिल्हा उद्योग केंद्रासमोर, काटा रोड, वाशिम येथे संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे