राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम..प्रभावी नोंदणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार..टीबीमुक्त भारत संकल्प


राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम

प्रभावी नोंदणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार

टीबीमुक्त भारत संकल्प

वाशिम,दि.११ (जिमाका )क्षयरोग (टीबी) मुक्त भारत या संकल्पनेअंतर्गत सन २०२५ पर्यंत “ टीबी मुक्त भारत ” करण्याकरिता सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे.ग्राम पंचायतस्तरावरदेखील क्षयरोग मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी वाशिम जिल्ह्यात टीबी मुक्त पंचायत हा नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे.क्षयरोगाशी निगडित समस्यांची निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतीमध्ये स्पर्धा निर्माण करून ग्रामपंचायतीना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम टप्यात ३० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
          जिल्हयात टीबी मुक्त पंचायत हा नवीन उपक्रमांतर्गत प्रथम टप्यात ३० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतीनी १००० लोकसंख्येमध्ये वर्षभरात कमीत कमी ५० स्पुटम घेणे आवश्यक आहे. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये वर्षभरामध्ये कमीत कमी दोन क्षयरुग्ण किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण असतील याची खात्री करावी.अश्या ग्रामपंचायती पात्र ठरतील. त्यांना २४ मार्च २०२४ ला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी सन २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत करण्याचे धोरण आखले आहे. यानुसार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा वाशिम अंतर्गत ११०० पब्लिक आणि ८०० खाजगी क्षयरुग्ण असे एकूण १९०० क्षयरुग्ण नोटिफिकेशन (नोंदणीचे) चे जिल्ह्याला उद्दिष्ट दिलेले आहे.यापैकी आतापर्यंत पब्लिकमध्ये ५०७ तर खाजगी क्षेत्रामध्ये ३९९ रुग्णांची नोंदणी झालेली आहे. एकूण जिल्हयात ९०६ रुग्णांची नोंद झालेली आहे.
       सन २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत करण्याकरिता सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे यामध्ये गव्हमेंट सोबत खाजगी क्षेत्रातून देखील क्षय रुग्णांची नोंदणी होत आहे.शासनाने मे २०१२ पासून टीबी आजार नोटी फायबल डीसीस जाहीर केला असून या कायद्यांमध्ये सुधारणा करून सन २०१८ पासून त्याला कायद्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. यानुसार सर्व खाजगी दवाखाने, सर्व लॅब व औषध विक्रेते यांना टीबीचा रुग्णची नोंद करून आरोग्य विभागास माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
           कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त भारत अभियान राबविले जात असून त्या अंतर्गत टीबीमुक्त पंचायत हा नवीन उपक्रम राबविणे सुरू केला आहे. याचा उद्देश पंचायतराज संस्थांना सक्षम करणे हा आहे. याकरिता क्षयरोगाशी निगडित समस्यांची निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतीमध्ये स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही क्षयरोग मुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबविल्या जाईल.
   
“शासनाने टीबीमुक्त पंचायत हा नवीन उपक्रम २४ मार्च २०२३ घोषणा केली आहे. त्यानूसार उपक्रम राबविणे सुरू केलेला आहे. याचा उद्देश पंचायतराज संस्थांना सक्षम करणे हा आहे. याकरिता क्षयरोगाशी निगडित समस्यांची निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतीमध्ये स्पर्धा निर्माण करणे व पारितोषिक देऊन त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करणे असा आहे.” जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतीश परभनकर यांनी कळविले आहे

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे