वसतीगृहाच्या मार्गदर्शिकेची अंमलबजावणी
वसतीगृहाच्या मार्गदर्शिकेची अंमलबजावणी
वाशिम दि.22 (जिमाका) मागासवर्गीय मुला मुलींच्या शासकीय वस्तीगृहासाठी आयुक्त, समाज कल्याण यांनी उच्चस्तरीय समिती गठित करून शासकीय वसतीगृह योजना मार्गदर्शिका तयार केली आहे. या मार्गदर्शिकेची अंमलबजावणी राज्यातील वसतीगृहात करण्याच्या सूचना दिल्या आहे. वसतीगृहातील नियमावली तसेच विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून वसतीगृहाच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात एकूण 22 नियमासह हमीपत्र नमूद केले आहे.
या मार्गदर्शिकेच्या अनुषंगाने वसतीगृहातील प्रवेशित व्यवस्थापनाने कोणतेही नवीन नियम तयार केलेले नाही.शासकीय वसतीगृहात लावण्यात आलेले नियम हे आयुक्तालयाने ठरवून दिलेल्या नियमांचेच पालन केले जात आहे.वसतीगृहस्तरावर कोणतेही नियम बनविले जात नसल्याची माहिती समाज कल्याणच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी दिली.
Comments
Post a Comment