अ.जा.व नवबौध्द समाजातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना




अ.जा.व नवबौध्द समाजातील नवउद्योजकांसाठी

मार्जिन मनी योजना

       वाशिम, दि. 18 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाकडे (सिडबी) वर्ग करण्यात आली आहे. सिडबीने या रकमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले आहे. लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाईल त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजक अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. १० टक्के रक्कम स्वहिस्सा राहील.
         या योजनेच्या मार्गदर्शक सुचना ९ डिसेंबर २०२० आणि 26 मार्च 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहे. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे सादर करावे असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

                                                                                                                                          *******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर