महसूल रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ


महसूल रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
                                  
        वाशिम, दि. 1 (जिमाका) : महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना तसेच लाभार्थ्यांना व्हावी. तसेच महसूल सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नागरीकांना होवून त्यांनी या सप्ताहात सहभागी व्हावे. यासाठी महसूल दिनाचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या महसूल रथाला जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी आज 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या शुभारंभ प्रसंगी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम, अपुर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री ललीत वऱ्हाडे, सखाराम मुळे, वैशाली देवकर, तहसिलदार सर्वश्री गजेंद्र मालठाणे, दीपक पुंडे, प्रतिक्षा तेजनकर, कुणाल झाल्टे, राजेश वजीरे, रवि राठोड यांचेसह महसूल व अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         या महसूल रथावर महसूल सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आहे. हा रथ 1 ऑगस्ट रोजी मंगरुळपीर तालुका, 2 ऑगस्ट-कारंजा तालुका,3 ऑगस्ट-मानोरा तालुका, 4 ऑगस्ट- रिसोड तालुका, 5 ऑगस्ट-मालेगाव तालुका, व 6 ऑगस्ट -वाशिम तालुका मार्गक्रमण करुन नागरींकाना महसूल विभागाच्या योजनांची माहिती देखील देणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे