अ.जा., इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क वसुल करु नये समाज कल्याण विभागाचे आवाहन




अ.जा., इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील

विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क वसुल करु नये

समाज कल्याण विभागाचे आवाहन

          वाशिम, दि. 18 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने समाज कल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, ईतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शैक्षणिक योजना महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलद्वारे लाभ देण्यात येतो. शैक्षणिक वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नविन/ नुतनीकरणाचे प्रवेश करतेवेळी राज्य सामायीक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या केंद्रीयभुत प्रवेश प्रक्रीयेच्या माध्यमातून प्रवेश प्राप्त होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गानुसार शासनस्तरावरुन महाडिबीटी प्रणालीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी पोर्टलद्वारे दिली जाते.

           अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शैक्षणिक योजनांचा महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलद्वारे लाभ देण्यात येतो. सद्यस्थितीत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. जिल्हयातील कनिष्ठ/ वरिष्ठ व्यवसायीक, बिगरव्यावसायीक महाविद्यालयांनी कोणत्याही शिष्यवृत्ती पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशाच्यावेळी शासनाकडून देण्यात येणारी शुल्काची रक्कम वसुल करु नये. रक्कम वसूल करुन नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित महाविद्यालय कारवाईस पात्र राहील. याबाबत सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

                                                                                             *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे