जिल्हाधिकाऱ्यांकडून " शासन आपल्या दारी " तयारीचा आढावा


जिल्हाधिकाऱ्यांकडून " शासन आपल्या दारी " तयारीचा आढावा 

वाशिम दि 22 (जिमाका) " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत वाशीम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले.सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,मोहन जोशी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, राजेश सोनखासकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे व दिगंबर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                   जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यांनी " शासन आपल्या दारी " या उपक्रमाअंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची सर्व विभागांनी यादी निश्चित करावी असे सांगितले. सर्व विभागांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना निश्चित करून किती लाभार्थ्यांना या उपक्रमांतर्गत लाभ देता येईल याची माहिती उपलब्ध करून द्यावी. वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनांपासून या उपक्रमादरम्यान एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.ज्या लाभार्थ्यांना या उपक्रमादरम्यान आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे, त्याची माहिती व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक विहित नमुन्यात नमूद करावे असे सांगितले.
               सभेला सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश