*जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांची विविध संस्थांना भेट व महिला बाल भवन बांधकामाची पाहणी*
*जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांची विविध संस्थांना भेट व महिला बाल भवन बांधकामाची पाहणी*
वाशिम दि.20 (जिमाका) जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज 20 ऑगस्ट रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यरत दिशा मुलींचे निरीक्षणगृह /बालगृह,बाल कल्याण समिती,सखी वन स्टॉप सेंटर आणि महिला व बाल भवनाच्या बांधकामास सदिच्छा भेट दिली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी,बाल कल्याण समिती अध्यक्षा डॉ.अल्का मकासरे,सदस्या डॉ.मंजुषा जांभरूणकर,परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे,गजानन पडघन,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी जिनसाजी चौधरी,संरक्षण अधिकारी भगवान ढोले,अधीक्षक गोपाल मोरे यावेळी उपस्थित होते.
भेटी दरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी बालगृहातील प्रवेशित मुलींशी संवाद साधला.मुलींना चांगले शिक्षण,सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण,क्रीडाक्षेत्राकडे करीअरच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मुलींना खेळामध्ये आवड निर्माण करण्यासाठी तसेच आवडीच्या खेळात सहभागी करून प्रशिक्षण देणे,मुलींना करमणुकीसाठी आनंददायी ठिकाणी सहलीचे आयोजन करणे,दर्जदार शिक्षण मिळावे यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.तसेच सखी वन स्टॉप सेंटर येथील मुलींसोबत त्यांनी चर्चा केली.महिला व बाल भवनाच्या बांधकामाची देखील पाहणी केली.
Comments
Post a Comment