सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांचा दौरा कार्यक्रम
सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांचा दौरा कार्यक्रम
वाशीम दि.13(जिमाका) सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील हे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय मोटारीने नागपूर येथून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने वाशिमकडे प्रयाण.रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, वाशिम येथे आगमन व मुक्काम. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिमकडे प्रयाण.सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9:05 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण करतील. सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने कारंजा (लाड) कडे प्रयाण करतील.सकाळी 11:30 वाजता कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती यांचे निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 12:30 वाजता कारंजा (लाड) येथील वन पर्यटन केंद्र येथे आगमन व वन पर्यटन केंद्राच्या प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्राच्या नामकरण सोहळ्याला उपस्थिती.दुपारी 1 वाजता शेतकरी निवास,मंगरूळपीर रोड,कारंजा (लाड) येथे आयोजित सभेला उपस्थित राहून दुपारी 3 वाजता शासकीय मोटारीने कारंजा (लाड) येथून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment