जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 5 वी प्रवेशास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ




जवाहर नवोदय विद्यालय

इयत्ता 5 वी प्रवेशास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

       वाशिम, दि. 28 (जिमाका) :  प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुन्हा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी  www.navodaya.gov.in किंवा www.cbseitms.rcil.gov.in/nvs या संकेतस्थळावर भेट देवून विनामुल्य अर्ज करु शकतात.

          नोंदणीकृत उमेदवारांकरीता ऑनलाईन अर्जामध्ये बदल करण्यासाठी दूरुस्ती खिडकी शेवटच्या तारखेनंतर दोन दिवस उघडण्यात येणार आहे. ज्यामध्ये लिंग, प्रवर्ग, क्षेत्र, अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम या क्षेत्रामध्ये दूरुस्ती करता येईल. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे