महाराष्ट्र भूषण पुरस्कार : 31 ऑगस्टपर्यंत वैयक्तिक माहिती मागविली




महाराष्ट्र भूषण पुरस्कार

31 ऑगस्टपर्यंत वैयक्तिक माहिती मागविली

       वाशिम, दि. 30 (जिमाका) :  महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. 25 लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या आणि मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मानित करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

           पुरस्कारासाठी पात्रता व निकष - संबंधित व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाव्दारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास किंवा क्रीडा अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथील करण्यात येईल. त्या व्यक्तीचे राज्यात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे. पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

           पुरस्काराचे स्वरुप - या पुरस्काराची रक्कम 25 लक्ष रुपये इतकी राहील. पुरस्कारर्थीला मानचिन्ह आणि स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात येईल. ज्या व्यक्तींना या पुरस्कारासाठी नोंदणी करावयाची असेल अशा व्यक्तींनी वरील नमुद पात्रता व निकषांच्या अधिन राहून आपली वैयक्तिक माहिती 31 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे