जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात पंचप्रण शपथ ग्रहण
जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात
पंचप्रण शपथ ग्रहण
वाशिम, दि. 09 (जिमाका) : आज 9 ऑगस्ट रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, वाशिम येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून " मेरी माटी मेरा देश " हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. शपथेचे वाचन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्या उपायुक्त तथा सदस्या डॉ. छाया कुलाल यांनी केले. यावेळी कार्यालयातील गोपाल गणोदे, वैशाली पठाडे, स्वाती पवार, अरविंद ताजने, सुमेध खंडारे, मोहन तिडके, पंकज ठाकूर व कविता पुर्णे यांची उपस्थिती होती.
*******
Comments
Post a Comment