आयआयटी बॉम्बे मिशन पोषण संयोजक व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम आयोजित "माता शिशु पोषण प्रशिक्षण"



आयआयटी बॉम्बे मिशन पोषण संयोजक व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम आयोजित

  "माता शिशु पोषण प्रशिक्षण"

वाशिम दि .19 (जिमाका) माता शिशु पोषण प्रशिक्षण,जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी श्रीमती.बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर,आयआयटी बॉम्बे स्टेट ट्रेनर श्रीमती रुपल व श्री. देवाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
        दोन दोन दिवसीय प्रशिक्षण हे तीन टप्प्यात पार पडणार आहे. 
परीक्षेच्या आधारे जिल्ह्यातील  निवडक आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्यसेवक व सेविका, परिचारिका,वैद्यकीय अधिकारी व सामुदायिक आरोग्य अधिकारी अशा एकूण 260 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन मास्टर ट्रेनर बनविण्याचा मानस आयआयटी बॉम्बे मिशन पोषण संयोजक व आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम यांनी हाती घेतला आहे. 
 
           या प्रशिक्षणात जिल्ह्यातील जन्मतः कमी वजनाचे बालक, विकासात्मक विलंब बालक,कुपोषित बालके हे जन्माला येऊ नये तसेच प्रमाण कमी करण्यासाठी,गर्भधारणा काळात घ्यावयाचा पोषक आहार, ब्रेस्ट फिडींग इत्यादीबाबत या प्रशिक्षणात माहिती देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे