14 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव


*14 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव* 
  
वाशिम दि.13 (जिमाका) रानभाज्यांचे आहारात महत्वाचे स्थान आहे.रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासोबतच त्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे दैनंदिन आहारातून नागरिकांना मिळावी.यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या आत्मा कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. 
           सध्याच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध असणाऱ्या विषमुक्त व आरोग्यदायी औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या ज्यामध्ये पाने,शेंगा,फुले,फळे,मुळे व कंदवर्गीय अशा विविध अंगी असणारा जंगलातील रानमेवा रानभाजी महोत्सवात उपलब्ध असणार आहे. त्याचे विविध पदार्थ आणि औषधी गुणधर्म याविषयी माहितीचे प्रदर्शनसुद्धा असणार असल्याने रानभाज्याची ओळख आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी नागरिकांना माहिती व्हावी हा महोत्सवाचा उद्देश आहे .
           जिल्ह्यातील महिला बचतगट तसेच आदिवासी महिला,शेतकरी गटांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे यांनी केले आहे.  वाशिम शहरातील नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन या रानभाज्या खरेदी कराव्या.रानभाज्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद या महोत्सवास भेट देऊन घ्यावा.असेही आवाहन आत्मा कार्यालयाने केले आहे. 
                रानभाजी महोत्सवाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे