Posts

Showing posts from June, 2022

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा  वाशिम दि.२८(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जल जीवन मिशन कार्यक्रमाचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपवनसंरक्षक श्री मीना,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष कोरे, पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व्ही.आर.वेले आणि जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.       जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना श्री. षण्मुगराजन यांनी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसेच मिशनची कामे सध्या कोणत्या टप्प्यात आहेत, पाण्याचे स्रोत कोणते आहेत,तसेच रेट्रो फ़िटिंगच्या कामाच्या प्रगतीची व प्रलंबित नळजोडण्याची माहिती देखील यावेळी घेतली.          जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये रेट्रो फिटिंगच्या

पीसीपीएनडीटी कार्यक्रम खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

Image
पीसीपीएनडीटी कार्यक्रम  खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम  वाशिम दि.२८(जिमाका) गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची गोपनीय माहितीची तक्रार एका खबरी व्यक्तीने ८४५९८१४०६० या भ्रमणध्वनीवर केली होती.या तक्रारीची तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी तात्काळ दखल घेऊन तपासणीसाठी सारसकर हॉस्पिटल येथे वैद्यकीय पथकाला सोबत घेऊन धाड टाकली होती.धाडी दरम्यान डॉ. सारसकर आणि बोगस डॉ. विलास ठाकरे यांना रंगेहात अवैधरित्या गर्भपात करताना पकडण्यात आले होते. सदर गोपनीय माहिती देणाऱ्या खबरी व्यक्‍तीस १ लाख रुपये शासनाने दिले आहे.           तत्कालीन समुचित प्राधिकारी डॉ.मधुकर राठोड यांनी डॉ सारसकर आणि बोगस डॉ.विलास ठाकरे यांचेविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून डॉ सारसकर व बोगस डॉ.विलास ठाकरे यांना अटक केली होती.त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू आहे.             जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात आणि गर्भलिंग निदान चाचणी होत अ

हर घर झेंडा हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा षण्मुगराजन एस.

Image
हर घर झेंडा हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा                                                              षण्मुगराजन एस.        वाशिम ,   दि.   27   (जिमाका)   :  भारती य स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने नागरीकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्या. या लढयातील क्रांतीकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणारा हर घर झेंडा हा उपक्रम ध्वजसंहितेचे पालन करुन प्रभावीपणे राबविण्यात यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.           27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्याबाबत आयोजित आढावा सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक श्री. मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी कराकृषी विभागाचे आवाहन

Image
शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा कृषी विभागाचे आवाहन        वाशिम ,   दि.   27   (जिमाका)   :  यंदा च्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला मंडळात 75 मिमी, केकतउमरा मंडळात 105.8 मीमी, रिठद महसूल मंडळात 134.6 मीमी, कवठा महसुल मंडळात 135.9 मीमी. पाऊस पडला आहे. या महसुल मंडळात पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली होती. 17 जूनपर्यंत मंगरुळपीर तालुक्यातील शेलु महसुल मंडळात 70.1 मीमी, धानोरा महसुल मंडळात 73.1 मीमी., मानोरा तालुक्यातील मानोरा महसुल मंडळात 96.9 मीमी, गिरोली महसुल मंडळात 72.5 मीमी, उमरी महसुल मंडळात 84 मीमी. पावसाची नोंद झाली आहे. या भागात जेमतेम पाऊस पडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. 26 जून अखेर वाशिम तालुक्यात 82.2 मीमी. रिसोड तालुक्यात 139.2 मीमी, मालेगांव तालुक्यात 86.8 मीमी, मंगरुळपीर तालुक्यात 94.6 मीमी, मानोरा तालुक्यात 96.4 मीमी आणि कारंजा तालुक्यात 55.7 मीमी. पावसाची नोंद झाली आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे तातडीने पुर्ण करावी षण्मुगराजन एस.

Image
रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे तातडीने पुर्ण करावी                                                                  षण्मुगराजन एस. कॅच द रेन मोहिमेचा आढावा         वाशिम, दि.27 (जिमाका) :  भुगर्भातील पाण्याच्या पातळीत नियोजनातून वाढ करण्यासाठी पावसाळयात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब हा भूगर्भात मुरविणे गरजेचे आहे. जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात विविध यंत्रणा, सेवाभावी संस्था तसेच अशासकीय संस्थांनी पावसाळयात पावसाच्या पाण्याचे भूगर्भात संकलन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे तातडीने पुर्ण करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.            जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज 27 जून रोजी केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानाअंतर्गत कॅच द रेनचा आढावा श्री. षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक श्री. मीणा, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमेश तांगडे, व

सामाजिक न्याय दिवस उत्साहात साजरा

Image
सामाजिक न्याय दिवस उत्साहात साजरा *गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* *समता दिंडीचे आयोजन* वाशिम,दि.२६ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण,सहायक आयुक्त कार्यालय,वाशिमच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा 26 जून हा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ   आंबेडकरी विचारवंत गोपाळराव आटोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे, शिवमंगल आप्पा राऊत,सु.ना.खंडारे,  लोककलावंत संतोष खडसे,अविनाश कांबळे,अनंत जुमडे,सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.जमदाडे उपस्थित होते.                   कार्यक्रमाच्या सुरुवातीला  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी पूष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.            याप्रसंगी सामाजिक समता दिंडीचे आयोजन करण्यात आले.माँ गंगा नर्सींग कॉलेज, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,समाजकार्य

ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा

Image
ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा         वाशिम, दि.24 (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय,वाशिम येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन विविध माध्यमातून साजरा करण्यात आला. २२ जुन १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक समितीची स्थापना झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिन साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ठ बनविण्याच्या हेतुने प्रोत्साहन देऊन प्रवृत करण्यासाठी ऑलिम्पिक डे साजरा करण्यात येतो.            जिल्हा क्रीडा संकुल येथे २३ जुन रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. ऑलिम्पिंक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता ह्या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणुन योग चिकित्सक,आयुष विभाग तेजस्विनी माणिकराव,राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बॉडे, बालाजी शिरसीकर, आर्चरी संघटना उज्वला डुडुल, राजुभाऊ सांगळे, कराटे संघटना सुनिल देशमुख, रायफल शुटींग प्रल्हाद आळणे, क्रीकेट विक्की खोबरागडे, किक बॉक्सींगचे रणजित कथडे आदी उपस्थित होते.            सुरुवातीला बालाजी शिरसीकर यांनी क जिल्हा क्र

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

Image
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु          वाशिम दि.24 (जिमाका) :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2022 सत्रासाठी प्रवेश प्रक्रीयेला ऑनलाईन पध्दतीने सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत ऑनलाईन प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य संदिप बोरकर यांनी दिली.          उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी  https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्यावर प्रवेश प्रक्रीया, नियमावली, प्रमाणित कार्यपध्दती पीडीएफ स्वरुपामध्ये उपलबध करुन देण्यात आलेली आहे.संस्थेत यावर्षी या जिल्हास्तरीय संस्थेमध्ये एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये बेसिक कॉस्मेटॉलॉजी,कार पेंटर, कॉम्प्यूटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, फॅशन डिझाईन ॲन्ड टेक्नॉलॉजी, फुड प्रोडक्शन, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीक ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स, केमॅनिक डिझेल व वेल्डर आणि दोन वर्षीय अभ्यासक्रमामध्ये मेकॅनिक मोटर व्हेईकल,रेफ्रीजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर टेक्नीशिअ, इलेक्ट्रीशिअन, फिटर या व्यावसायाचा समावेश आहे.   

26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन

Image
26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन         वाशिम, दि.24 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून या वर्षीही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 26 जून 2022 रोजी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करुन या चौकातून समता दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे येऊन त्याठिकाणी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी कळविले आहे. ***

अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींकरीता निवासी शाळा प्रवेशोत्सवासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे

Image
अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींकरीता निवासी शाळा  प्रवेशोत्सवासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे         वाशिम, दि.२ 3  (जिमाका) :  जिल्हयातील वाशिम तालुक्यातील सुरकुंडी,मंगरूळपिर तालुक्यातील तुळजापुर आणि रिसोड तालुक्यातील सवड येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत.या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार निवास,भोजन,पाठ्यपुस्तके,स्टे शनरी व गणवेश इत्यादी मोफत सुविधा दिल्या जातात.याशिवाय सुसज्ज ग्रंथालय, ई-लायब्ररी, प्रयोगशाळा, मनोरंजन कक्ष, संगणक कक्ष, व्यायामशाळा, इत्यादी सोयी सुविधांचा लाभ प्रवेशित विदयार्थाना दिला जातो. तसेच या निवासी शाळांमध्ये अनुभवी शिक्षक वर्ग असून विविध शिक्षणपुरक उपक्रम राबविले जातात.            सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २७ जून २०२२ पासून होत आहे. शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सर्व प्रवेशित विदयार्थांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व स्टेशनरी दिली जाणार आहे. नव्याने प्

जिल्हा न्यायालयात मध्यस्थीबाबत जनजागृती शिबीर संपन्न

Image
जिल्हा न्यायालयात मध्यस्थीबाबत जनजागृती शिबीर संपन्न         वाशिम, दि.२३ (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जून रोजी जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. न्या आर. पी. कुलकर्णी यांनी प्रकरणांची श्रेणी येथे मध्यस्थी योग्य आहे आणि मध्यस्थी प्रक्रीया या विषयावर विस्तृत  मार्गदर्शन केले. प्रशिक्षित मध्यस्थ अॅड. पी. एस. देशमुख यांनी मध्यस्थीचा आधार आणि त्याचे फायदे याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ कलोती यांनी अध्यक्षीय भाषणातून सद्यःस्थितीत 'मध्यस्थी' या पर्यायाची सर्व खटल्यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी केले. संचालन श्रीमती हर्षा बारड यांनी केले. आभार जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सचिव अॅड. ए. पी. वानरे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व न्यायीक अधिकारी, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष,सदस्य गण,कर्मचारी  व पक

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज

Image
       आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज        पूर्वीच्या काळात येणारी संकटे ही बहुतांश नैसर्गिक असत.मानवाने प्रगतीला जसजशी सुरुवात केली तसतशी संकटेही वाढू लागली. मानवाने आपली प्रगती करताना निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करायला सुरूवात केली. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये गुंतागुंत अधिकच वाढत गेली.वाढती लोकसंख्या आणि प्रगती करताना निसर्गाच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यामुळे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी दुहेरी संकटे निर्माण झाली.                    नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन आपत्तीचे प्रकार आहेत. नैसर्गिक घडामोडीतून घडणाऱ्या आपत्ती ह्या नैसर्गिक असतात. मानवांच्या विशिष्ट कृत्यातून घडणाऱ्या आपत्ती ह्या मानवनिर्मित असतात.महापूर,वाळू-वादळ, हिम-वादळ,धूळ-वादळ,चक्रीवादळ, भूकंप,ज्वालामुखी,त्सुनामी, भूस्खलन,वीज कोसळणे,धुके पडणे, उष्ण व शितलहर,दुष्काळ,संसर्गजन्य रोग,कीड व उल्कापात ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत.मानव निर्मित आपत्तीमध्ये अपघात,आग,वणवा, दरोडा,वायुगळती,तेलगळती, कारखाना व खाणीतील विस्फोट, युद्ध,चेंगराचेंगरी,अणुस्फोट जैविक अस्त्रांचा स्फोट,बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे,हत

फुटबॉल खेळासाठी 26 जुन रोजी अमरावती येथे निवड चाचणी

Image
फुटबॉल खेळासाठी 26 जुन रोजी अमरावती येथे निवड चाचणी         वाशिम, दि. 22 (जिमाका) :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम येथे विविध खेळाचे अयोजन करण्यात येते. जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रामध्ये  चांगल्या प्रकारची आवड युवा वर्गाला असल्याने क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंची संख्या वाढत आहे. तसेच खेळाडूंची नव्याने भरती करण्याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने सुध्दा विविध खेळाचे आयोजन करण्यात येते. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणाकरीता व संघ उभारणी, नव्याने खेळाडूंची भरती करण्याकरीता १४ व १६ वर्षांखालील खेळाडूंची निवड चाचणी खेळाडूंची मानके पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे.             १४ वर्षांखालील खेळाडूंची जन्मतारीख ०१ जानेवारी २००९ ते ०१ जानेवारी २०१३ या दरम्यान असावी. खेळाडूंची उंची १५८ सेमीच्या वर असावी. १६ वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख ०१ जानेवारी २००६ ते ०१ जानेवारी २००८ या दरम्यान असावी. खेळाडूंची उंची १६८ सेमीच्या वर असावी. अशाप्रकारे फुटबॉल खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच जे खेळाडू

मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती सहामाही तालुकास्तरीय शिबीर

Image
मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती सहामाही तालुकास्तरीय शिबीर          वाशिम,दि.22 (जिमाका) :  तालुकास्तरावर मोटार वाहन तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती चाचणी व प्रक्रियेसाठी शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वाशिम यांनी केले आहे.  जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत शिबीर कामकाजाचे नियोजन  उप प्रादेशीक परिवहन अधिकारी यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.             जुलै महिन्यात कारंजा येथे  5 व 19 जुलै रोजी, रिसोड येथे 7 जुलै रोजी, मानोरा येथे 12 जुलै रोजी आणि मंगरुळपीर येथे 14 जुलै रोजी. ऑगस्ट महिन्यात कारंजा येथे  4 व 23 ऑगस्ट रोजी, रिसोड येथे 12 ऑगस्ट  रोजी, मानोरा येथे 17 ऑगस्ट  रोजी आणि मंगरुळपीर येथे 19 ऑगस्ट  रोजी,  सप्टेंबर महिन्यात कारंजा येथे  6 व 20 सप्टेंबर रोजी, रिसोड येथे 8 सप्टेंबर रोजी, मानोरा येथे 13 सप्टेंबर रोजी व मंगरुळपीर येथे 15 सप्टेंबर रोजी, ऑक्टोबर महिन्यात कारंजा येथे 4 व 20 ऑक्टोबर रोजी, रिसोड येथे 11 ऑक्टोबर रोजी, मानोरा येथे 13 ऑक्टोबर रोजी व मंगरुळपीर येथे 18  ऑक्टोबर रोजी, नोव्हेंबर महिन्यात कारंजा येथे  3 व 22 नोव्हेंबर रोजी, रिसोड येथे 9 नोव्हेंबर

23 जून रोजी ऑलिम्पिंक दिनाचे आयोजन

Image
23 जून रोजी ऑलिम्पिंक दिनाचे आयोजन          वाशिम,दि.22 (जिमाका) : जिल्हा क्रीडा कार्यालय येथे 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून विविध माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. 23 जून 1894 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक समितीची स्थापना करण्यात आली. या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून साजरा केला जातो.जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ठ बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास प्रवृत्त करण्यासाठी ऑलिम्पिंक दिवस साजरा करण्यात येतो. राज्यात या दिवसाचे महत्व जागविण्यासाठी व राज्यातील खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी क्रीडाविषयक वातावरण निर्मित्ती करणे व क्रीडाविषयक संवर्धन करण्यासाठी 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून जिल्हयात साजरा करण्यात येत आहे. ऑलिम्पिंक दिवसाचे महत्व ओळखून क्रीडा विषयक प्रात्याक्षिके, खेळाडूंचा सत्कार, परिसंवाद, खेळातील फिजीओथेरिपीचे महत्व इत्यादी उपक्रमाचे आयोजन 23 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे *******

जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Image
जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा           वाशिम, दि. 22 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ,वाशिमच्या वतीने 21 जून रोजी जिल्हा न्यायालयात  आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश अमोघ कलोती  होते.योग प्रशिक्षक संतोष भारसाकळे यांनी प्रात्याक्षिकाव्दारे योगाचे महत्व  उपस्थितांना सांगून योगाचे प्रशिक्षण दिले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी, विधिज्ञ मंडळी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीमती हर्षा बारड यांनी मानले.  *******

अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची सभा संपन्न

Image
अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची सभा संपन्न  वाशिम दि.२१(जिमाका) जिल्ह्यात अंमली पदार्थाचे सेवन,विक्री व व्यापार होणार नाही आणि अंमली पदार्थाच्या आहारी युवा पिढी जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची सभा आज २१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झाली.या सभेला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे शिक्षणाधिकारी श्री शिंदे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,वाशीमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत,मंगरुळपिर व कारंजा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.जाधव यांची उपस्थिती होती.          षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. अंमली पदार्थांना झाडांची लागवड केली जाणार याबाबत दक्षता घ्यावी. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.जिल्ह्याची युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाणार नाही या बाबीकडे लक्ष द्यावे. शाळा आणि महाविद्

वाशिम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Image
वाशिम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा  वाशिम दि.२१(जिमाका) जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद,वाशिम यांच्या संयुक्त वतीने ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज २१ जून रोजी वाटाणे लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार ऍड. किरणराव सरनाईक,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोरे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक),रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व वाटाणे लॉनचे संचालक श्री.वाटाणे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.          उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीमती पंत यांनी योग दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. अर्चना मेहकरकर,तेजस्विनी माणिकराव आणि आशिष जामकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त

कारंजा येथील रोजगार मेळाव्यात १०२ रोजगार इच्छुक उमेदवारांची रोजगारासाठी निवड

Image
कारंजा येथील रोजगार मेळाव्यात १०२ रोजगार इच्छुक उमेदवारांची रोजगारासाठी निवड         वाशिम ,   दि.   21  (जिमाका) :  कारंजा येथे  १९  जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १०२ रोजगार इच्छूक उमेदवारांची विविध कंपन्यात रोजगारांसाठी प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार जिल्हयातील रोजगार इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. याच धर्तीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाकडून जिल्हयातील नोकरी/रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने १९ जून २०२२ रोजी कारंजा येथे सकाळी

'२१ जून' ‘जागतिक योग दिन’ करा 'योग' रहा नि'रोग'..

Image
लेख '२१ जून' ‘जागतिक योग दिन’ करा 'योग' रहा नि'रोग'..      श्रीमद्‌ भगवद्‌गीतेमध्ये "योगः कर्मसु कौशलम्‌, पतंजलीनी योगः चित्तवृत्ती निरोधः' अशी योगाची व्याख्या केली आहे. या योगशास्त्राच्या व्याख्या असे सांगतात, की आपल्या कामातील कार्यातील कौशल्य, कुशलता म्हणजे योग. चित्तवृत्तींवर शाश्‍वत जीवनाच्या मार्गावर योग आपणाला घेऊन जातो. जीवनाची बाल्यावस्था, प्रौढ किंवा वृद्धावस्था या तीनही स्तरावर योग आपणाला अतिशय उपयुक्त ठरतो, हे प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.     योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते.         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समा

वांगी येथे बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन

Image
वांगी येथे बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन  वाशिम दि.१८(जिमाका) खरीप पीक लागवड व पेरणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया मोहिम राबविण्यात येत आहे. बीजप्रक्रिया मोहिमेमध्ये  राज्य पुरस्कृत सोयाबीन मूल्य साखळी विकास प्रकल्पांतर्गत वाशिम तालुक्यातील मौजे वांगी येथे १७ जून रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला वांगीच्या सरपंच अर्चना भोयर, उपसरपंच सविता भोयर, ग्रामपंचायत सदस्य माधव भोयर, बालाजी भोयर, सतीश भोयर,वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, कृषी पर्यवेक्षक सुनील वाळूकर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी सहाय्यक नागेश हातोलकर, गजानन नरवाडे, संजय कुटे, बाळू इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.     कार्यक्रमामध्ये मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रकल्पाबाबत माहिती देऊन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या विविध बाबींविषयी विस्तृत माहिती दिली व शेतकऱ्यांना योजनेमध्ये अनुदान घेण्यासाठी कोणकोणत्या बाबीं केल्या पाहिजे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.    

जिल्हाधिकाऱ्यांची आसेगाव (पेन) येथे भेट कृषीविषयक उपक्रमांची पाहणी

Image
जिल्हाधिकाऱ्यांची आसेगाव (पेन) येथे भेट कृषीविषयक उपक्रमांची पाहणी वाशीम दि.१८(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी १७ जून रोजी रिसोड तालुक्यातील आसेगाव(पेन) येथे भेट देऊन  राबविण्यात येत असलेल्या कृषीविषयक उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार अजित शेलार व तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.          सरी-वरंब्यावर सोयाबीन लागवड, बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी व नीती आयोगाकडून महिला बचत गटांना दिलेले सीड ड्रेसिंग ड्रम व महिला बचत गटाने केलेली सोयाबीन तुरीची बीज प्रक्रिया याबाबतची माहिती श्री.षण्मुगराजन यांनी जाणून घेतली व उपस्थितांशी संवाद साधला.       यावेळी सरपंच विमल खानजोडे, पोलीस पाटील,रविकांत तिखे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष खानजोडे,माजी सरपंच विजय थोरात, कृषी पर्यवेक्षक श्री धनकर,कृषी सहाय्यक ए.जी.इंगोले,जी.एस. शिरसाठ,तलाठी श्री वानखेडे,हनुमान आरु,संदीप चव्हाण,एम.टी.शिंदे, प्रगतिशील शेतकरी अनिल खानजोडे, दिगंबर खानजोडे,भारत खानजोडे, निलेश

वीज पडणे व पूर परिस्थितीच्या आपत्ती प्रसंगी काय करावे व काय करू नये

Image
वीज पडणे व पूर परिस्थितीच्या आपत्ती प्रसंगी काय करावे व काय करू नये याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन          वाशिम, दि.१७ (जिमाका) :  मान्सून काळात विज पडणे/वज्राघात होणे याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे जीवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यात याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहे. नागरिकांनी आवश्यक दक्षता घेण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आवाहन करण्यात आले आहे.            काय करावे-  वादळी वारा, वीज चमकत असल्यास, घरात असल्यास घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. घराचे दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून तीस मिनीटे घरातच राहा. घराबाहेर असल्यास सुरक्षित निवारा शोधून तिथे थांबा. ट्रॅक्टर, सायकल, बाईक, शेती अवजारे यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी थांबा. उघड्यावर असाल व सुरक्षित निवारा जवळपास नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्य

स्कुलबस योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करा

Image
स्कुलबस योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन             वाशिम, दि. १७ (जिमाका) :  जिल्हयातील सर्व शाळा हया 27 जून 2022 रोजी सुरु होणार आहे. स्कुल बस चालक/ मालक यांनी त्यापूर्वी स्कुल बसचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करुन घेणे अनिवार्य आहे. आपल्या स्कुल बसची योग्यता प्रमाणपत्र 27 जून पूर्वी करुन घ्यावे. अन्यथा तपासणी दरम्यान स्कुल बसचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण केल्याचे न आढळून आल्यास स्कुल बस विरुध्द मोटार वाहन कायदयांतर्गत कारवाई करण्यात येईल. याची नोद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे. *******

२० जून रोजी महिला लोकशाही दिन

Image
२० जून रोजी महिला लोकशाही दिन            वाशिम, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असेल तर त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही आयोजित करण्यात येतो. या महिन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन हा २० जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. असे प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी कळविले आहे. *******

जिल्हयाच्या विकासाला मिळाली योजनांच्या अंमलबजावणीतून गती

जिल्हयाच्या विकासाला मिळाली योजनांच्या अंमलबजावणीतून गती ·          54 कामातून 2182 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार ·          कृषी क्षेत्रातील कामाचे राज्यात अनुकरण ·          पिक कर्ज वाटपासाठी यावर्षी 100 कोटी रुपये अतिरिक्त उपलब्ध         वाशिम ,   दि.   17   (जिमाका) :  जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची, अभियानाची व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हयात करण्यात येत असल्यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली आहे. अकोला जिल्हयाच्या विभाजनातून 1 जुलै 1998 मध्ये नव्याने वाशिम जिल्हा अस्तित्वात आला. नव्याने अस्तित्वात आलेल्या या जिल्हयाचे मागासलेपण ओळखून इथल्या नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरुन आणि जिल्हा प्रशासनाकडून काम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हयाच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.            जिल्हयाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. जिल्हयात मोठे सिंचन प्रकल्प आणि जिल्हयातून वाहणाऱ्या मोठया नदया नसल्याने जिल्हयाचे सिंचन क्षेत्र तसे कमी आहे. तसेच जिल्हयाचे पर्जन्यमानही कमी आहे. इथल्या शेतकऱ्यांचे जीवनम

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

Image
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश        मुंबई, दि. १७ : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १७ जून रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले.            आज श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबूसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, सुनिल महाराज, धन्नु महाराज (कर्नाटक), जगनू महाराज (कर्नाटक), रामसिंग महाराज, यशवंत महाराज, सुंदर महाराज त्याचप्रमाणे मेहताबसिंग नाईक, ॲड. अभय राठोड, पोपटलाल चव्हाण, गोपाल राठोड व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.             मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पोहरादेवी तीर्थक्षेत्राची कामे रखडता कामा नये. वेळच्या वेळी त्यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रीतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष क

२१ जून रोजी वाशिम येथे योग दिन कार्यक्रम

Image
२१ जून रोजी वाशिम येथे योग दिन कार्यक्रम  वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद,वाशिम यांच्या संयुक्त वतीने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन वाशिम येथील वाटाणे लॉन येथे सकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.             जिल्हास्तरावर होणाऱ्या या मुख्य कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुखांनी सहभागी व्हावे तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करावा. योग दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे.अशा सूचना जिल्हाधिकारी श्री षण्मुगराजन यांनी यावेळी दिल्या.                क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनाची माहिती दिली. २१ जून रोजी वाशिम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सकाळी ६:३० वाजता कार्यक्रमस्थळी सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी उपस्थ

मागील चार वर्षात 14 जूनपर्यंत यावर्षी सर्वाधिक खरीप पीक कर्ज वाटप 74 टक्के शेतकऱ्यांना मिळाले 63 टक्के पीक कर्ज 81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटी 85 लाख रुपये पीक कर्ज उपलब्ध

Image
मागील चार वर्षात 14 जूनपर्यंत यावर्षी सर्वाधिक खरीप पीक कर्ज वाटप 74 टक्के शेतकऱ्यांना मिळाले 63 टक्के पीक कर्ज 81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटी 85 लाख रुपये पीक कर्ज उपलब्ध          वाशिम ,   दि.   17   (जिमाका) :  जिल्हयाचा मुख्य व्यवसाय हा शेती. जिल्हयाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. 4 लाख 59 हजार 763 हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. त्यापैकी खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 4 लाख 6 हजार हेक्टर आणि रब्बी पिकाखालील क्षेत्र 82 हजार 166 हेक्टर इतके आहे. तर सिंचनाखालील क्षेत्र हे केवळ 51 हजार 773 हेक्टर इतके आहे. जिल्हयाचे मुख्य पीक हे सोयाबीनचे आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पत पुरवठा करण्यात बॅकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. मागील चार वर्षाचा विचार केल्यास सन 2019-20 ते सन 2022-23 या चार वर्षाच्या कालावधीतील 14 जूनपर्यंत सर्वाधिक खरीप पीक कर्जाचे वाटप यावर्षी 14 जून 2022 पर्यंत 63.47 टक्के करण्यात आले.             जिल्हयातील बहुतांश पिकाखालील क्षेत्र हे कोरडवाहू आहे. मोठया प्रमाणात सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर