अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची सभा संपन्न

अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची सभा संपन्न 

वाशिम दि.२१(जिमाका) जिल्ह्यात अंमली पदार्थाचे सेवन,विक्री व व्यापार होणार नाही आणि अंमली पदार्थाच्या आहारी युवा पिढी जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची सभा आज २१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झाली.या सभेला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे शिक्षणाधिकारी श्री शिंदे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,वाशीमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत,मंगरुळपिर व कारंजा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.जाधव यांची उपस्थिती होती.
         षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. अंमली पदार्थांना झाडांची लागवड केली जाणार याबाबत दक्षता घ्यावी. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.जिल्ह्याची युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाणार नाही या बाबीकडे लक्ष द्यावे. शाळा आणि महाविद्यालयातून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्याचे काम शिक्षण विभागाने करावे.अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींची  अंमली पदार्थ सेवनाच्या तावडीतून मुक्तता करावी.व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्या व्यक्तीची सेवनाच्या आहारी जाण्यामागची पूर्वाश्रमीची माहिती घ्यावी.कृषी व महसूल विभागाने लक्ष देऊन जिल्ह्यात कुठे खसखस किंवा गांजा पिकांची लागवड होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात असलेल्या रासायनिक कारखान्यात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. 
        पोस्ट व कुरियरच्या माध्यमातून जिल्ह्यात अमली पदार्थाचा पुरवठा होणार नाही याकडे लक्ष दयावे.असे सांगून श्री.षण्मुगराजन म्हणाले, अमली पदार्थांचा काही व्यक्तींच्या माध्यमातून व्यापार होतो का याबाबतची माहिती घ्यावी असे त्यांनी  सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे