21 जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन
- Get link
- X
- Other Apps
21 जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने
आंतरराष्ट्रीय योग दिन
वाशिम, दि. 14 (जिमाका) : २१ जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात योग प्रशिक्षक संतोष भारसाकळे हे प्रात्याक्षिकाव्दारे योगाचे महत्व विषद करुन प्रशिक्षण देणार आहेत. तरी या योग दिनाच्या कार्यक्रमास सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ मंडळ सदस्यगण तसेच कर्मचारी वृंद यांनी २१ जून २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सकाळी ८.१५ या वेळेत जिल्हा न्यायालयातील कक्ष क्र. १३ मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment