२१ जून रोजी वाशिम येथे योग दिन कार्यक्रम

२१ जून रोजी वाशिम येथे योग दिन कार्यक्रम 

वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद,वाशिम यांच्या संयुक्त वतीने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन वाशिम येथील वाटाणे लॉन येथे सकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           जिल्हास्तरावर होणाऱ्या या मुख्य कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुखांनी सहभागी व्हावे तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करावा. योग दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे.अशा सूचना जिल्हाधिकारी श्री षण्मुगराजन यांनी यावेळी दिल्या.  
             क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनाची माहिती दिली. २१ जून रोजी वाशिम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सकाळी ६:३० वाजता कार्यक्रमस्थळी सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी उपस्थित रहावे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता होईल.यावेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात येईल.जिल्हाधिकारी हे मनोगत व्यक्त करून योग दिनानिमित्त प्रतिज्ञ वाचन करतील. त्यानंतर योग प्रात्यक्षिक कार्यक्रमास सुरुवात होईल. मंचावर योग संघटनेचे डॉ.भगवंतराव वानखेडे,डॉ.अर्चना मेहकरकर व तेजस्विनी माणिकराव  हे योगाबाबत उपस्थितांना प्रशिक्षण देऊन योगाचे प्रात्यक्षिके करून घेतील.अशी माहिती श्री.पांडे यांनी यावेळी दिली.
                या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी डाबेराव, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी श्री.मकासरे, समाज कल्याण निरीक्षक संगीता राठोड,विद्याभारतीचे दिलीप जोशी, स्काऊट - गाईडच्या जिल्हा संघटक प्रीती गोलर, योगशिक्षक डॉ.अर्चना मेहकरकर, पुष्पलता अफूने,आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय चव्हाण, संजय लहाने व बालाजी शिरसीकर यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे