लाभार्थ्यांनी शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज करावे

लाभार्थ्यांनी शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज करावे

वाशिम दि.०८(जिमाका) गावे रोगराई मुक्त व्हावी तसेच उघड्यावर शौचास जाण्याची ग्रामीण भागातील प्रथा कायमची बंद व्हावी.यासाठी शौचालयाचा ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांनी वापर करावा या उद्देशाने
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - २ अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम करावयाचे आहे अशा लाभार्थ्यांकरीता अनुदान मागण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे.
        स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यावर १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात येते.याआधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाभार्थी निश्चित करून पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषदच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या वेबसाईटवर लाभार्थ्याचे नाव ऑनलाइन करण्यात येत होते. लाभार्थी निश्चित झाल्यावर शौचालय पूर्ण करून त्या शौचालयाचा फोटो जिओटॅग केल्यानंतर लाभार्थ्यांना शौचालय प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात येत होते. 
   अद्यापपर्यंत ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाहीत अशा लाभार्थ्यांना आता ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शौचालय प्रोत्साहन अनुदानाकरिता मागणी करता येणार आहे.यासाठी लाभार्थ्यांनी मोबाईल, कॉम्प्युटर, सायबर कॅफे अथवा इतर सामान्य ऑनलाइन सेवेद्वारे संकेतस्थळावर भेट देऊन आपली नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे संचालक गजानन वेले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे