मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती सहामाही तालुकास्तरीय शिबीर



मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती

सहामाही तालुकास्तरीय शिबीर

         वाशिम,दि.22 (जिमाका) : तालुकास्तरावर मोटार वाहन तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती चाचणी व प्रक्रियेसाठी शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वाशिम यांनी केले आहे.  जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत शिबीर कामकाजाचे नियोजन  उप प्रादेशीक परिवहन अधिकारी यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.

            जुलै महिन्यात कारंजा येथे  5 व 19 जुलै रोजी, रिसोड येथे 7 जुलै रोजी, मानोरा येथे 12 जुलै रोजी आणि मंगरुळपीर येथे 14 जुलै रोजी. ऑगस्ट महिन्यात कारंजा येथे  4 व 23 ऑगस्ट रोजी, रिसोड येथे 12 ऑगस्ट  रोजी, मानोरा येथे 17 ऑगस्ट  रोजी आणि मंगरुळपीर येथे 19 ऑगस्ट  रोजी,  सप्टेंबर महिन्यात कारंजा येथे  6 व 20 सप्टेंबर रोजी, रिसोड येथे 8 सप्टेंबर रोजी, मानोरा येथे 13 सप्टेंबर रोजी व मंगरुळपीर येथे 15 सप्टेंबर रोजी, ऑक्टोबर महिन्यात कारंजा येथे 4 व 20 ऑक्टोबर रोजी, रिसोड येथे 11 ऑक्टोबर रोजी, मानोरा येथे 13 ऑक्टोबर रोजी व मंगरुळपीर येथे 18  ऑक्टोबर रोजी, नोव्हेंबर महिन्यात कारंजा येथे  3 व 22 नोव्हेंबर रोजी, रिसोड येथे 9 नोव्हेंबर रोजी, मानोरा येथे 15 नोव्हेंबर रोजी आणि मंगरुळपीर येथे 17 नोव्हेंबर रोजी आणि डिसेंबर महिन्यात  कारंजा येथे  6 व 20 डिसेंबर रोजी, रिसोड येथे 8 डिसेंबर रोजी, मानोरा येथे 13 डिसेंबर रोजी व मंगरुळपीर येथे 15 डिसेंबर रोजी हे शिबिर आयोजित केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे