Posts

Showing posts from April, 2026

खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून  जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी      पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे वाशिम, (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने व वेळेत काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खरीप हंगाम, जल जीवन मिशन तसेच विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, सिंचन सुविधा व कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करावी, तसेच पीक नियोजनाबाबत प्रभावी मार्गदर्शन देण्यात यावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये आणि खरीप हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीचाही आढावा घेऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकर व्यवस्था, जलस्रोत पुनर्भरण, विहिरी व बोअरवेल...

जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवूनस्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन         वाशिम, दि.३० एप्रिल (जिमाका) जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात दि.१ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वतः सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगीन करावे. त्यानंतर लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एस ई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा ११ अंकी क्रमांक दि.१५ मे २०२६ नंतर घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकाला देवून जनगणना प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जनगणना मोहिमेतील स्व-गणना प्रक्रिया सुरक्षित, सुलभ व सोईस्कर आहे. जनगणनेचे संकेतस्थळ इंग्र...

शेतकरी गटांना नवे व्यासपीठ; ‘फार्मर ग्रुप लीग २०२६’ स्पर्धेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
शेतकरी गटांना नवे व्यासपीठ; ‘फार्मर ग्रुप लीग २०२६’ स्पर्धेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम, (जिमाका) शेतकऱ्यांच्या प्रगतीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फार्मर ग्रुप लीग (FGL) २०२६’ या अनोख्या स्पर्धेचे भव्य उद्घाटन आणि स्पर्धेच्या लोगोचे अनावरण राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले. यावेळी खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, आ. सईताई डाहाके, आ. अमित झनक, तसेच विधानपरिषद सदस्य आ. भावना गवळी, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरणराव सरनाईक, आ. बाबुसिंग महाराज राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, विभागीय कृषी सहसंचालक गणेश धोरपडे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट फार्मर गटांच्या माध्यमा...

जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करू पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे

Image
जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करू   पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे  महादेव कुंड व बामणदरी प्रकल्पासाठी सकारात्मक पाऊल वाशिम,  (जिमाका) जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले. किन्हीराजा गावातील महादेव कुंड व बामणदरी परिसराच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर व्हिडिओ व पीपीटी सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर करण्यात आले. या सादरीकरणात परिसरातील नैसर्गिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्याची व्यापक संकल्पना मांडण्यात आली. किन्हीराजा गावाचा महाभारतकालीन भद्रावती, वाकाटक व राष्ट्रकूट काळातील कंकावती असा समृद्ध ऐतिहासिक वारसा अधोरेखित करण्यात आला. समृद्धी महामार्गामुळे किन्हीराजा हे अनेक शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असून, येथे पर्यटन हब विकसित होण्याची क्षमता असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले....

नियोजनबद्ध अंमलबजावणीतून जिल्ह्याच्या विकासाला गती ना. दत्तात्रय भरणे जिल्हा नियोजन समितीची बैठक

Image
नियोजनबद्ध अंमलबजावणीतून जिल्ह्याच्या विकासाला गती                   ना. दत्तात्रय भरणे जिल्हा नियोजन समितीची बैठक  मार्च अखेर ४०६ कोटींच्या खर्चास मंजुरी  वाशिम, (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध निधीचा नियोजनबद्ध, पारदर्शक आणि वेळेत वापर होणे अत्यावश्यक असून, मंजूर योजनांची अंमलबजावणी ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून त्याचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.  जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती आराखडा २०२६ चा समारोप करण्यात आला. तसेच दि. २० जानेवारी २०२६ रोजी झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालनाचा आढावा घेण्यात आला. उपस्थित खासदार व आमदार यांनी मांडलेल्या प्रश्नांवरील अनुपालन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केला. यावेळी खासदा...

जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त विशेष मुलाखत #जनगणना२०२७#वाशिम

Image

अचूक माहिती हीच विकासाची पायाभरणी; जनगणना २०२७ यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

Image
अचूक माहिती हीच विकासाची पायाभरणी; जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद  वाशिम,  (जिमाका) जनगणना ही केवळ आकडेवारी नसून शासनाच्या धोरणनिर्मितीची भक्कम पायाभरणी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक व प्रामाणिक माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जनगणना जिल्हा समन्वयक शशांक रूखने तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणनेच्या कार्यपध्दतीची संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, जनगणना २०२७ करीता जिल्हाधिकारी यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी तहसिलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांची चार्ज अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १...

नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देवून बांधिलकी जोपासावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Image
नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देवून बांधिलकी जोपासावी   जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम वाशिम,  (जिमाका) नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासन उभारण्याच्या उद्देशाने कार्य झाले पाहिजे. नागरिकांना शासकीय सेवा देताना विहित कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. लोकसेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहण्याची लोकसेवा हक्क शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, शासकीय सेवेत काम क...

वाशिम जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन !

Image
विशेष वृत्त वाशिम जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन ! ३२६७ बचत गटांच्या माध्यमातून ३३ हजारांहून अधिक महिलांचे सक्षमीकरण वाशिम, (जिमाका) महाराष्ट्र शासनाची महिला विकासासाठीची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या *महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)*ने वाशिम जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचा प्रभावी आणि व्यापक नमुना उभा केला आहे. सन २००२ पासून स्वयं सहाय्य बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य आज जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक उन्नतीचे भक्कम ‘इंजिन’ ठरत आहे. जिल्ह्यातील सर्व ६ तालुक्यांमध्ये ‘माविम’कडून बचत गट स्थापनेचे व बळकटीकरणाचे काम सातत्याने सुरू असून, ३४५ गावांमध्ये *कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर (CMRC)*च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाते. सध्या जिल्ह्यात एकूण १२ CMRC कार्यरत असून त्यापैकी एक शहरी भागात कार्यरत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३२६७ बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये २८५७ ग्रामीण तर ४१० शहरी बचत गटांचा समावेश आहे. या बचत गटांमध्ये एकूण ३३‌ हजार ९७ महिला सदस्य सक्रिय असून, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, अल...

लेक लाडकी’ योजनेतून महिला सक्षमीकरणाला बळ ;वाशिममध्ये ५ हजारांहून अधिक मुलींना लाभ

Image
विशेष वृत्त  लेक लाडकी’ योजनेतून महिला सक्षमीकरणाला बळ वाशिममध्ये ५ हजारांहून अधिक मुलींना लाभ वाशिम, (जिमाका) मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांच्या शिक्षणाला बळकटी देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेची वाशिम जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळत आहे.  जिल्ह्यातील हजारो मुलींना या योजनेचा थेट लाभ मिळत असल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ५११ पेक्षा अधिक मुलींचे अर्ज मंजूर झाले असून, त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) द्वारे पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तसेच २ हजार ९३१ अर्ज अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना विशेष लाभदायी ठरत आहे. अंगणवाडी स्तरावरून अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आल्याने ग्रामीण व दुर्गम भागा...

महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श ‘सीएमईजीपी’ योजनेतून मुक्ताताई घुगे यांची प्रेरणादायी यशोगाथा

Image
महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श  ‘सीएमईजीपी’ योजनेतून मुक्ताताई घुगे यांची प्रेरणादायी यशोगाथा वाशिम, (जिमाका) महिला सक्षमीकरण ही संकल्पना आत्मनिर्भरतेकडे नेणारी एक सशक्त चळवळ आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहत इतरांनाही रोजगार देणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, हीच या परिवर्तनाची खरी ओळख ठरत आहे. याचाच प्रत्यय वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील उद्योजिका मुक्ता अमित घुगे यांच्या यशोगाथेतून येतो.  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा उद्योग उभारून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. मुक्ता घुगे या गेल्या दोन वर्षांपासून स्क्रब घासणी व्यवसाय करत होत्या. सुरुवातीच्या काळात अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही त्यांनी हार न मानता नव्या उमेदीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.  उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सीएमईजीपी योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती पुनम घूले यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने उद्योग उभारण्याचा निर्धार केला. या योजनेअंतर्गत त्य...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’ महिला उद्योजिकांच्या यशाची नवी कहाणी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

Image
‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’  महिला उद्योजिकांच्या यशाची नवी कहाणी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ वाशिम, (जिमाका) ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही योजना महिला उद्योजिकांसाठी परिवर्तनाची नवी दिशा ठरत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून, त्यांच्या हाताला उद्योगाची ताकद मिळत आहे. या योजनेअंतर्गत “वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट” संकल्पनेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योगांना नवसंजीवनी मिळत असून महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये महिला उद्योजिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. सन २०२३-२४ मध्ये ७५ महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये हा आकडा झपाट्याने वाढून १३८ महिला उद्योजिका लाभार्थी ठरल्या. तर चालू सन २०२५-२६ मध्ये आतापर्यंत ५३ महिला उद्योजिकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ही वाढती आकडेवारी महिलांच्या उद्योजकतेकडे...

महिला सक्षमीकरणाला चालना मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा योजनेतून जिल्ह्यात ८५% प्रगती

Image
महिला सक्षमीकरणाला चालना   मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा योजनेतून जिल्ह्यात ८५% प्रगती वाशिम, (जिमाका) माता व बाल आरोग्य बळकट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात उल्लेखनीय प्रगती नोंदविण्यात आली आहे.  सन २०२५-२६ या कालावधीत मार्च २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यात ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे. जिल्ह्यासाठी एकूण ६२८० लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७८४७ नोंदणी झाली असून ६०२९ प्रसूती नोंदविण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे विविध हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले असून एकूण ५१५० लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे. ब्लॉकनिहाय कामगिरीत मंगरुळपीर (९८%) व कारंजा (९८%) हे तालुके आघाडीवर असून, वाशिम (८४%), रिसोड (८३%), मानोरा (८१%) यांनीही चांगली कामगिरी नोंदवली आहे. मालेगाव येथे (५७%) प्रगती असल्याचे दिसून येते.  यामुळे गर्भवती माता व बालकांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक आधार मिळत आहे. या योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मोफत उपचार, तपासण्या व आर्थि...

शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण'हळद तिखटाच्या' उद्योगातून घडविली यशाची 'चव'

Image
शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण 'हळद तिखटाच्या' उद्योगातून घडविली यशाची 'चव' स्नेहल मंत्री यांची उल्लेखनीय झेप वाशिम, (जिमाका) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आत्मविश्वास, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यशाचा मार्ग कसा घडविता येतो, याचे प्रभावी उदाहरण सौ. स्नेहल लक्ष्मीकांत मंत्री यांनी निर्माण केले आहे. गृह उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत त्यांनी महिला उद्योजकतेचा आदर्श उभा केला असून स्वावलंबनासोबत रोजगारनिर्मितीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे.  वाशिम तालुक्यातील काटा येथील रहिवासी स्नेहल मंत्री यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये बँकेकडून ८ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त करून उद्योग उभारणीस प्रारंभ केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून २.८० लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने उद्योगाला भक्कम आधार मिळाला. या आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने त्यांनी हळद, तिखट आणि विविध मसाल्यांच्या निर्मिती व प्रक्रियेचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मर्या...

महिला सक्षमीकरणाची ‘स्वराली’ गाथा; मसाले उद्योगातून मीराची यशस्वी झेप

Image
महिला सक्षमीकरणाची ‘स्वराली’ गाथा; मसाले उद्योगातून मीराची यशस्वी झेप वाशिम, (जिमाका) जिद्द, मेहनत आणि शासन योजनांची योग्य साथ मिळाली, तर ग्रामीण भागातील महिला केवळ स्वावलंबीच होत नाहीत, तर इतरांसाठी रोजगारनिर्मितीचे केंद्रही ठरू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कळंबा (महाली) येथील मीरा दीपक कापसे. ‘स्वराली’ मसाले उद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श उभा करत त्यांनी स्वावलंबनाची यशस्वी वाटचाल घडविली आहे. चूल आणि मूल एवढ्यापुरतेच महिलांचे कार्यक्षेत्र मानल्या जाणाऱ्या पारंपरिक चौकटीला छेद देत मीरा कापसे यांनी सुरुवातीला टेलरिंग व्यवसायातून उद्योजकतेचा पाया रचला. या माध्यमातून काही महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यानंतर रेडिमेड कपडे व साड्या विक्रीचा व्यवसाय केला; मात्र त्यातून अपेक्षित समाधान न मिळाल्याने त्यांनी नव्या संधीचा शोध घेतला. याच काळात वाशिम येथील आर-सेटीमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण घेतल्याने त्यांच्या विचारांना दिशा मिळाली.  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मसाले उत्पादन क्षेत्रात उतरा...