Posts

Showing posts from October, 2017

‘रन फॉर युनिटी’ दौडला वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
·         विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग ·         जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ वाशिम , दि . ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवस हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज वाशिम जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वप्रथम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रियांका मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, पोलीस उपाधीक्षक श्री. धात्रक, मारवाडी युवा मंचचे मनीष मंत्री, क्रीडा संघटनेचे धनंजय वानखेडे आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सकाळी ८ वाजता दौड सुरु झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी स्वतः दौडमध्ये धावण्यासाठी नागरिकांमध

कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही - किशोर तिवारी

Image
·         कापूस, सोयबीन हमीभाव खरेदीचा आढावा ·         आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना ·         सर्व गरीब नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या वाशिम , दि . २७ :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, असे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध शासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डी. एल. जाधव, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे आदी उपस्थित होते. श्री. तिवारी म्हणाले, कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीतील बिनचूक माह

कृषि विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर शासनाचा भर - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         महाकर्जमाफीस पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ ·         कर्जमाफीमुळे गरीब शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ·         कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ३३ शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार वाशिम , दि . १८ :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ऐतिहासिक महाकर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यास सुरुवात झाल्याने गोरगरीब शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, शेतीचा विकास व्हावा, यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर राज्य शासनाने भर दिला असल्याचे महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. महाकर्जमाफीच्या प्रारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके आदी उपस्थित होते. याप्रसंगी कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात ३३ शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. पालकमंत्री ना. राठोड म्हणाले की,

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास बुधवारपासून प्रारंभ

·          कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते होणार सत्कार   वाशिम ,  दि .  १६  :    राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ऐतिहासिक महाकर्जमाफीच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस बुधवार, दि. १८ ऑक्टोंबर २०१७ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने दि. १८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या निवडक ५० शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. कर्जमाफीच्या प्रारंभानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातील निवडक दोन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात मुंबई येथील कार्यक्रमाच

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

Image
वाशिम , दि . १३ :   दि. १५ ऑक्टोंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यावर्षी दि. १५ ऑक्टोंबर २०१७ रोजी शासकीय सुट्टी असल्याने दि. १३ ऑक्टोंबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे होते. यावेळी  जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड,  डॉ. नालेगावकर, समाधान अवचार, ज्ञानदेव भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. गवळी म्हणाले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य केले. प्रचंड मेहनतीच्या जोरावर आणि चिकाटीने स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र निर्मिती करून देशाला सक्षम बनविले. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या डॉ. कलाम यांनी आपल्या कार्यातून देशाच्या

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·          मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा ·          महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा ·          दि. २२ व २९ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविली जाणार वाशिम , दि . १२ : राज्यात दि. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकवर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होते आहे. या कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख व सर्व तहसीलदार  उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये पुरुष व महिला मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या लिंग गुणोत्तर प्रम

कृषि सेवा केंद्रामध्ये गुणनियंत्रक अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         ‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा बैठक ·         शेतीपूरक व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करा ·         सोयाबीन, तूर पिकाला पर्याय देण्यासाठी प्रयत्न करा वाशिम , दि . ०९ : बियाणे, कीटकनाशक वापराबद्दल योग्य माहिती घेण्यासाठी तसेच बोगस बियाणे, औषधे याविषयी तक्रार करण्यासाठी कृषि विभागाचे गुणनियंत्रक अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता कृषि विभागाचे गुणनियंत्रक अधिकारी व संबंधित गाव, मंडळ, तालुक्याचे क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेला फलक जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांच्या दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, अनिसा महाबळे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. भरत गीते यांच्यासह नियामक मंडळाचे अशासकीय, शासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द

डिजीटलायझेशनमुळे दरमहा 38 हजार मेट्रिक टन धान्याची बचत-मुख्यमंत्री

Image
मुंबई, दि.  1 : प्रशासन लोकाभिमुख व पारदर्शक व्हावे यासाठी राज्याने पारदर्शकता, सर्वसमावेशकता व कार्यक्षमता या त्रिसूत्रीच्या आधारावर शासनाचे सुशासनात रुपांतर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डिजीटलायझेशनमुळे दरमहा 38 हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे तर  उद्योग विभागाच्या ‘मैत्री’ प्रकल्पाच्या माध्यमातून 90 हजार कोटींच्या प्रकल्पांना फायदा झाला आहे,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  ‘ मी मुख्यमंत्री बोलतोय ’  या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून नागरिकांचे ई - मेल ,  व्हॉट्सॲप ,  एसएमएसद्वारे प्रश्न मागविण्यात आले होते .  आलेल्या प्रश्नांना तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली . अडीच कोटी शिधापत्रिका डिजीटलाईज्ड मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,  सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत केलेल्या डिजीटलायझेशनमुळे सध्या राज्यात 2.5 कोटी रेशन कार्ड डिजीटल झ