Posts

Showing posts from June, 2016

‘चला, एक तरी झाड लावू, वसुंधरा वाचवू’

Image
·         वृक्षदिंडीद्वारे वृक्षारोपण करण्याचा संदेश ·         विद्यार्थ्यांनी सांगितले वृक्षारोपणाचे महत्त्व ·         वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन वाशिम , दि . २९ :  दिनांक १ जुलै २०१६ रोजी राज्यात राबविण्यात येत असलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरिता जनजगृती करण्यासाठी आज जिल्हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग व शिक्षण विभागाच्यावतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘चला, एक तरी झाड लावू, वसुंधरा वाचवू’ असा संदेश देत वृक्षरोपणाविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याहस्ते वृक्षदिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक के. आर. राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी एस. आर. नांदूरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक गिरी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अंबादास पेंदोर, स्काऊट अॅण्ड गाईडचे श्री. गावंडे, नोडल अधिकारी तात्या नवघरे यांच्यासह शहरा

एकजूट झालं गाव, साकारला भव्य तलाव !

Image
·          ४४ दिवसांत खोदले ५ कोटी लिटर साठवण क्षमतेचे तळे ·          लोकवर्गणीतून ९५ लक्ष रुपये खर्च वाशिम जिल्ह्यात असलेल्या तामसी गावातील ग्रामस्थांनी एकजूट होऊन अवघ्या ४४ दिवसांत सुमारे पाच कोटी लिटर क्षमतेच्या तळ्याची निर्मिती केली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तामसीकरांनी लोकसहभागातून साकारलेले हे तळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. पूर्णतः लोकसहभागातून निर्माण झालेल्या या तळ्यामुळे पुढील वर्षी या गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार असून ‘पाणीदार गाव’ अशी तामसीची नवी ओळख निर्माण होणार आहे. वाशिम शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर तामसी हे साडेतीन हजार लोकवस्ती असलेलं गाव. गत काही वर्षात झालेला अपुरा पाऊस आणि भूजल पातळी खालावल्याने जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणे या तामसीलाही दुष्काळाचा सामना करावा लागत होता. खरीप हंगामातही शेतीला पुरेसे पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट होत होती. त्यामुळे गावातील शेतकरी वर्ग चिंतेत होता. गत पाच वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये या गावाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला ३-४ विहिरींचे अधिग्रहण करावे लागत होते. तरीही पुरेसे पाणी उपलब्ध होऊ श