Posts

Showing posts from May, 2023

ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता -षण्मुगराजन एस. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर

Image
ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता                                                                 -षण्मुगराजन एस. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर       वाशिम, दि. 31 (जिमाका) :  आज विविध क्षेत्रात करीअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे. शिक्षण घेत असतांनाच आपल्याला कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे आहे हे आधी निश्चित करावे. आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी युवा वर्गाने कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.          वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयात आज कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीरात अध्यक्ष म्हणून श्री. षण्मुगराजन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, युपीएससी यश मिळविणारे अनुराग घुगे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक

नियोजन भवन येथे1 जून रोजी नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळाश ेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

Image
नियोजन भवन येथे 1 जून रोजी नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळा शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन        वाशिम, दि. 31 (जिमाका) :  इंडिया फार्मर्स फर्टिलायझर को. ऑ. लिमिटेड (इफको) आणि कृषी विभाग, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 1 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे असतील. कार्यशाळेला इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे हे उपस्थित शेतकऱ्यांना नॅनो युरीया व नॅनो डीएपीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नॅनो खत वापर हे तंत्रज्ञान नवीन असल्याने याबाबत परिपुर्ण माहिती वितरक/क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांना नसल्याने हे तंत्रज्ञान माहिती अवगत करुन देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.            विभागातील इतर अधिकारी/कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती करुन घे

चना खरेदीचा एसएमएस आल्यासश ेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी न्यावा

Image
चना खरेदीचा एसएमएस आल्यास शेतकऱ्यांनी  चना विक्रीसाठी  न्यावा        वाशिम, दि. 31 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने रब्बी हंगाम 2022-23 या वर्षात चना खरेदी सुरु केली आहे. केंद्र शासनाचे यापुर्वीचे 2 लक्ष 42 हजार 480 क्विंटल चना खरेदीचे उदिष्ट संपल्यामुळे शासनाने आता 84 हजार 66 क्विंटल नवीन चना खरेदीसाठी उदिष्ट वाढवून दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी चना या पिकाची ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतू चना विक्री केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना सब एजंट संस्थेमार्फत चना खरेदीसाठी एसएमएस देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन चना खरेदीचे एसएमएस येतील त्या शेतकऱ्यांनी आपला चना त्या त्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जावा. शासनाच्या हमी भावाचा लाभ घेण्यासाठी शासनाने दिलेल्या खरेदी कालावधीमध्ये 11 जूनपर्यंत आपला चना नोंदणी केलेल्या खरेदी केंद्रावर एसएमएसनुसार विक्री करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा पणन अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. *******

पिकांवरील शत्रु किडीच्या नायनाटासाठी दशपर्णी अर्क गुणकारी : तयार करुन ठेवण्याचे आवाहन

Image
पिकांवरील शत्रु किडीच्या नायनाटासाठी दशपर्णी अर्क गुणकारी : तयार करुन ठेवण्याचे आवाहन        वाशिम, दि. 31 (जिमाका) :  खरीप हंगाम तोंडावर आला असून   या हंगामातील कापूस ,  सोयाबीन ,  तूर ,  मूग आणि भाजीपाला या पिकांवरील मित्रकिडींचे संरक्षण आणि शत्रूकिडींचे निर्मूलन करण्यासाठी दशपर्णी अर्क गुणकारी आहे आणि तो वरदान ठरु शकतो. दशपर्णी अर्क हे उत्‍तम प्रतीचे किडनाशक ,  बुरशीनाशक व टॉनिक इत्‍यादी सर्वच प्रकारचे कार्य करते. दशपर्णी अर्क तयार होण्‍याकरीता ३० दिवसाचा कालावधी लागत असल्‍यामुळे दशपर्णी अर्क तयार करण्‍याची ही योग्‍य वेळ आहे. दशपर्णी अर्क तयार करण्‍याकरीता १० प्रकारच्‍या वेगवेगळया उग्र वासाच्‍या वनस्‍पतीच्‍या पाल्‍याचा उपयोग करण्यात येतो.         दशपर्णी अर्क तयार करण्याची पध्दत -  पाणी २०० लिटर ,  शेण २ किलो ,  गोमुत्र १० लिटर ,  हळद पावडर २०० ग्रॅम ,  अद्रक पेस्‍ट ५०० ग्रॅम ,  तंबाखु १ किलो ,  हिरवी तिखट मिर्ची १ किलो ,  लसुन १ किलो ,  करंज पाला   २ किलो (छोटया फांदयासह) ,  सिताफळ पाला २ किलो ,  एरंडी पाला २ किलो ,  पपई पाला २ किलो ,  कडुलिंब पाला ५ किलो ,  निरगुडीचा प

पानथळ व नदी नाले काठावरील जमीनीत सोयाबीन लागवड सरी वरंबा/ बीबीएफ टोकण यंत्राने कराकृषी विभागाचे आवाहन

Image
पानथळ व नदी नाले काठावरील जमीनीत सोयाबीन लागवड सरी  वरं बा / बीबीएफ टोकण यंत्रा ने  करा कृषी विभागाचे आवाहन        वाशिम, दि. 31 (जिमाका) :  जिल्‍हयात खरीप हंगाम २०२३ मध्‍ये एकुण खरीप क्षेत्रापैकी ३ लक्ष ४ हजार ८० हेक्‍टर (७६ टक्के) क्षेत्रावर सोयाबीन या मुख्‍य पिक लागवडीचे नियोजन आहे. मागील तीन वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीन उत्‍पादकतेचा विचार करता सन २०२० मध्‍ये १७६१ किलो प्रति हेक्‍टर, सन २०२१ मध्‍ये १६४१.४० किलो व सन २०२२ मध्‍ये १३८१.०८ किलो प्रति हेक्‍टर उत्पादन झालेले आहे. झालेले सोयाबीनचे उत्‍पादन पाहता यामध्‍ये वाढ करणे सहज शक्‍य आहे.             सरासरी उत्‍पादकता कमी येण्‍याची प्रमुख कारणे ,  हलक्‍या जमीनीत सोयाबीन पिक घेणे ,  वाणाची निवड जमीनीच्‍या मगदुराप्रमाणे न करणे ,  घरगुती बियाणे प्रतवारी न करता वापरणे ,  पेरणीपुर्वी उगवणशक्‍तीची खात्री न करणे ,  बुरशीनाशक व किटकनाशकाची बिजप्रक्रिया न करणे ,  पेरणी ५ से.मी. पेक्षा जास्‍त खोलीवर करणे ,  शिफारशीप्रमाणे रासायनिक खत न वापरणे ,  हेक्‍टरी रोप संख्‍या योग्‍य न ठेवणे व पारंपारीक पध्‍दतीने बहुपिक पेरणी यंत्राणे पेरणी कर

जलयुक्त शिवार अभियानातून 166 गावात होणार 4 हजार 267 जलसंधारणाची कामे· 12 कोटी रुपयांची 2304 कामांची अंदाजपत्रके तयार· आतापर्यंत 181 कामे पूर्ण

Image
जलयुक्त शिवार अभियानातून 166 गावात होणार 4  हजार 267  जलसंधारणाची कामे ·        12 कोटी रुपयांची 2304 कामांची अंदाजपत्रके तयार ·        आतापर्यंत 181 कामे पूर्ण   वाशिम, दि. 30 (जिमाका) :  सन 2023-24 या वर्षात जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या माध्यमातून जिल्हयातील 166 गावात मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, कृषी, वन आणि भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलसंधारणाची 4 हजार 267 कामे प्रस्तावित असून या कामामुळे या गावांच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राच्या प्राप्त उपचार नकाशांवरुन कार्यान्वीन यंत्रणांनी कामे प्रस्तावित केली आहे. या अभियानातून जलसाठयातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे पावसाळयापूर्वी करावयाची असल्याने या कामांना प्राथमिकता देऊन ही कामे सुरु करण्यात आली आहे. जिल्हयातील निवड केलेल्या 166 गावातील प्रस्तावित 4 हजार 267 कामांसाठी 23 कोटी 78 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. या गावातील 2 हजार 304 कामांचे 12 कोटी 88 लक्ष रुपयांचे अंदाजपत्रके संबंधित यंत्र

आयआयटी मुंबईकडून मिळणार आरोग्यविषयक प्रशिक्षण

Image
आयआयटी मुंबईकडून मिळणार आरोग्यविषयक प्रशिक्षण        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  जिल्हयात उपलब्ध संसाधनातून संपन्न आरोग्यकरीता प्रशिक्षण या योजनेतंर्गत भारतीय प्राद्यौगिक संस्था मुंबई अर्थात आयआयटी यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेकरीता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या प्रयत्नातुन मानव विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे संनियंत्रणाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.          जिल्हयातील कमी वजनाची बालके, कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागातंर्गत विशेष प्रयत्न केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत जिल्हयातील वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व इतर संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी अधिकारी व कर्मचारी यांची दोन टप्प्यांमध्ये निवड चाचणी होणार आहे. त्यापैकी उत्कृष्ट ३०० कर्मचारी यांची प्रशिक्षक म्हणून निवड क

शासन आपल्या दारीलाभार्थ्यांची निवड करुन याद्या तयार ठेवा -षण्मुगराजन एस.

Image
शासन आपल्या दारी लाभार्थ्यांची निवड करुन याद्या तयार ठेवा                                                                      -षण्मुगराजन एस.        वाशिम, दि. 30 (जिमाका) : “   शासन आपल्या दारी ” या उपक्रमातून जिल्हयातील 75 हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ देण्यात येणार आहे. विविध यंत्रणांनी या उपक्रमासाठी नियोजनपूर्वक काम करावे. जिल्हयातील कोणताही पात्र लाभार्थी हा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे. लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी लाभार्थ्यांची निवड करुन त्यांच्या याद्या तयार ठेवाव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.            जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज 30 मे रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा विविध यंत्रणेकडून आयोजित सभेत घेतला. यावेळी श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची मुख्य उपस्थिती होती.           श्री. षण्मुगराजन म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची

आंतरराष्ट्रीय स्पर्धा : खेळाडूंना मिळणार आर्थिक सहाय्य खेळाडूंकडून प्रस्ताव मागविले

Image
आंतरराष्ट्रीय स्पर्धा : खेळाडूंना मिळणार आर्थिक सहाय्य   खेळाडूंकडून प्रस्ताव मागविले        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण २०१२ तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.           या निर्णयाव्दारे ही योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना पुढील बाबीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादी. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शक

प्रधानमंत्री कुसुम-ब योजना कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरण : ऑनलाईन सुविधा उपलब्ध

Image
प्रधानमंत्री कुसुम-ब योजना कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरण : ऑनलाईन सुविधा उपलब्ध        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत कृषीपंपांना सौरऊर्जेवर आधारित विद्युतीकरण देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.        अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी शासन वेळोवेळी प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गतच शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्या सौर उर्जेवर करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला अर्थात प्रधानमंत्री कुसुम योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदा

भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरणासह तलावातील ग ाळ काढण्याची कामे यंत्रणांनी प्राधान्याने करावी -षण्मुगराजन एस. जलशक्ती, जलयुक्त व गाळमुक्तचा आढावा

Image
भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरणासह तलावातील गाळ काढण्याची कामे यंत्रणांनी प्राधान्याने करावी                                                                      -षण्मुगराजन एस. जलशक्ती, जलयुक्त व गाळमुक्तचा आढावा        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब भूगर्भात संचयन करण्याकरीता भूजल पुनर्भरणाची कामे यंत्रणांनी मोठया प्रमाणात करण्यासोबतच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात करण्याकरीता नाला खोलीकरणाची कामे करावी. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी प्रोत्साहित करावे. संबंधित यंत्रणांनी भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरणासह जिल्हयातील तलावातील गाळ काढण्याची कामे मोठया प्रमाणात करण्यासाठी या कामांना प्राधान्य दयावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, ग

आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *कोकणात आपत्ती सौम्यीकरण कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश* मुंबई दिनांक २९: विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.  राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करा तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा खर्च, कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे, कोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्च, ई पंचनामे, आपदा मित्र, ई सचेत प्रणाली आदि मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की

पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ मागणीसाठी नोंदणी करावीजिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ मागणीसाठी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन        वाशिम, दि. 29 (जिमाका) :  पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे शेतातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी गावाशेजारी असलेल्या तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा मृद व जलसंधारण विभागाकडे गाळाची मागणी नोंदवावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.          गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना आणि नीती आयोगाच्या निधीतून तलावांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि तलावातील सुपीक गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी तलावातील गाळ काढण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. ज्या गावाच्या परिसरात तलाव आहेत, त्या तलाव परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी तलावातील गाळाची मागणी मृद व जलसंधारण विभाग व ग्रामपंचायतीकडे नोंदविल्यास त्यांना तलावातील गाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.         ज्या शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकायचा आहे, त्यांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाशी संपर्

शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा

Image
शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा        वाशिम, दि. 26 (जिमाका) :  शेतकऱ्यांसाठी ‘महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक योजनेच्या पुढील टप्प्यांतर्गत सौर कृषी पंपाकरिता महाऊर्जेच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.          शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनसुार ३,५ व ७.५ एच.पी.(डी.सी) क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येतात.          या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थी हिस्सा पुढीलप्रमाणे असणार आहे. खुला (१० टक्के) ३ एचपी १९३८०रू,५ एचपी २६,९७५ रू, ७.५ एचपी ३७,४४० रू, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी  ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल. यात ३ एचपी ९,६९०,रू,  ५ एचपी १३,४८८ रू व ७.५ एचपी १८, ७२० रू आहे.         अर्ज ऑनलाईन सादर करताना त्यासोबत विहीर,कुपनलिका याची नोंद असलेला सातबारा,जमीन मालक एकापेक्षा जास्त असल्यास २०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नाहरकत पत्र,आधरकार्ड,छायाचित्र, पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.           शेतक-यांन

पांडव (उमरा) येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न

Image
पांडव (उमरा) येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न        वाशिम, दि. 26 (जिमाका) :  वाशिम तालुक्यातील पांडव उमरा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम आज 26 मे रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वाशिम जयप्रकाश लव्हाळे यांनी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सोयाबीन प्रात्यक्षिक तसेच सोयाबीन लागवड करतांना टोकन यंत्राने लागवड करावी. बीज प्रक्रीया केल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये तसेच हंगाम पूर्व सर्वांनी निंबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार करण्यासाठी जतन करुन ठेवाव्यात असे आवाहन केले.            कोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीचे फायदे, निंबोळी अर्काचा वापर केल्याने होणारे फायदे व खर्चातील बचत याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक ढोबळे, माणिक खिल्लारे, संजय ढोबळे, संघपाल जावळे, महिला बचत गटाच्या सदस्य वंदना सरकटे, आशा खिल्लारे, मंगला हिवराळे, तसेच शेतकरी मोहन कांबळे, मदन कांबळे, मालता खिल्लारे, विशाखा खिल्लारे, मिराबाई खिल्लारे, वैशाली हिवरा

1267 विद्यार्थ्यांनी घेतला स्वाधारचा लाभ

Image
1267 विद्यार्थ्यांनी घेतला स्वाधारचा लाभ        वाशिम, दि. 26 (जिमाका) :  सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहातील मर्यादित संख्येमुळे प्रवेश न मिळालेल्या/ शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी, 12 वी आणि इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुले-मुलींप्रमाणे भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरू केली आहे.            सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्राप्त एकूण 1978 अर्जामधून सन 2022-23 वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार बीजेएसच्या प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला शुभारंभ

Image
गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार बीजेएसच्या प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला शुभारंभ        वाशिम, दि. 26 (जिमाका) :  " गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार " या अभियानासाठी भारतीय जैन संघटनेने तयार केलेल्या प्रचार रथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मृदा व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, तांत्रिक सहाय्यक मयूर हुमणे, श्री. कोल्हे, भारतीय जैन संघटनेच्या सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, व्यवस्थापक अंकुश परांजळे, तालुका समन्वयक प्रफुल बानगावकर व सचिन लांडे यांची उपस्थिती होती.            जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त वतीने जिल्हयात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाचा गावागावात प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेच्या प्रचार रथाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्येक गावापर्यंत आपलं गाव जलसमृद्ध करावं, गाव जल आत्मनिर्भर करावं असा प्रचार या रथाच्या माध्यमातून

निती आयोगाच्या माध्यमातून 12 तलावातून काढला 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ 67 तलावातून 6 लक्ष 67 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन

Image
निती आयोगाच्या माध्यमातून 12 तलावातून काढला 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ 67 तलावातून 6 लक्ष 67 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन        वाशिम, दि. 26 (जिमाका) :  जिल्हयात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. जिल्हयातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. जिल्हयात सिंचनाच्या व्यवस्थेसाठी असलेल्या सिंचन प्रकल्पात मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. निती आयोगाच्या माध्यमातून 10 हेक्टर क्षमतेच्या जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या अधिनस्त असलेल्या तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत 12 तलावातून 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 67 तलावातून 6 लक्ष 67 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे.          तलावातून गाळ काढण्याच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी उपलब्ध होत आहे. शेतात गाळ टाकल्याने शेतातील पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. गाळ टाकल्यामुळे जमीन सुपीक होणार आहे. ज्या तलावातून गाळ काढण्यात येणार आहे, त्या तलावाची पाणी साठवण

कृषीपूरक अभ्यासक्रम सुरु करण्यास प्राधान्य द्यावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
कृषीपूरक अभ्यासक्रम सुरु करण्यास प्राधान्य द्यावे   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे               वाशिम (जिमाका)/रत्नागिरी दि. 25 : महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे  20 विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषी पूरक अभ्यासक्रम सुरु करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.             महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादाजी भुसे हे होते.             अर्धा एकर परिसरात केवळ 7 महिन्यांत उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या बांधकामाचे कौतुक करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थी, युवकांसाठी उद्योगधंद्यांच्या गरजानुसार विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या केंद्रातून अनेक गुणवंत विद्या

महाराष्ट्र पोलिस देशात अग्रेसर– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
महाराष्ट्र पोलिस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे               रत्नागिरी दि. २५ : महाराष्ट्र पोलिस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलिस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.               शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलिस दलाला 'जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकल व चार बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.             ते पुढे म्हणाले की, या वाहनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास निश्चितपणाने मदत होईल. पोलीसांच्या घर निर्मितीला त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलिस सक्षमपणाने कार्यरत राहिल्यामुळे नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. नागरिकांना पोलिसांची भिती वाटता कामा नये, तर चांगला अनु

शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
“ शासन आपल्या दारी ”  योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे             रत्नागिरी दि. 25 : “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.             रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते.             यावेळी  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह,  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्व बाजूने लोक सोबत जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहर

एकबुर्जी प्रकल्पावर दिले मान्सुनपूर्व प्रशिक्षणआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार

Image
एकबुर्जी प्रकल्पावर दिले मान्सुनपूर्व प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार        वाशिम, दि. 25 (जिमाका) :   वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांच्या अंतर्गत  एक दिवशीय मान्सूनपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिमचे तहसीलदार ज्ञानेश्वर घ्यार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी शाहू भगत, पोलीस निरीक्षक श्री. साळुंके, नायब तहसीलदार श्रीमती पुरोहित, स्विय सहाय्यक धर्मराज चव्हाण, अग्नीशमन अधिकारी श्री. तिरपुडे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अनिल वाघ, अशांत कोकाटे, आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे दीपक सदाफळे व श्याम सवाई, बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी युनिटचे शिक्षक अमोल काळे यांची उपस्थिती होती.        आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. भगत यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वृत्तपत्रात नेहमी वाचतो, अतिवृष्टी झाली, पुर आला, वीज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झाले. अलीकडे हवामान बदलामुळ

मुंबई पारबंदर- एमटीएचएल आर्थिक भरभराट आणणारा प्रकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

Image
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) बुधवार, दि. २४ मे २०२३ *मुंबई पारबंदर- एमटीएचएल आर्थिक भरभराट आणणारा प्रकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून - उपमुख्यमंत्री फडणवीस* *महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी पूर्ण* मुंबई, दि. २४:- मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक -आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत (MTHL) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आली. या समारंभात ते बोलत होते.  या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण या प्रकल्पाचे भूमिपूजन करणारे आण