अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा
- Get link
- X
- Other Apps
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी
महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा
वाशिम, दि. 17 (जिमाका) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज/अनुदान योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात कर्ज व अनुदान योजनेअंतर्गत 190 कर्ज प्रकरणांचे भौतीक व आर्थिक उदिष्ट तसेच प्रशिक्षण योजनेअंतर्गत 380 प्रशिक्षणाचे उदिष्ट दिले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र अर्जदारांनी कर्ज/ अनुदानासाठी विहीत नमुन्यातील अर्जासह जातीचे दाखले, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, रेशनकार्ड, दरपत्रक आदी कागदपत्रे आणि प्रशिक्षण घेवू इच्छीणाऱ्या पात्र व्यक्तींनी शैक्षणिक खंड प्रमाणपत्रासह प्रस्ताव 31 ऑगस्ट 2023 पूर्वी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे सादर करावे. असे महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment