१७ वर्षाखालील मुलांसाठी १५ दिवसांचे व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण शिबिर खेळाडूंकडून अर्ज मागविले





१७ वर्षाखालील मुलांसाठी

१५ दिवसांचे व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण शिबिर

खेळाडूंकडून अर्ज मागविले

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : व्हॉलीबॉल खेळाला राज्यामध्ये एक परंपरा आहे. विविध जिल्ह्यांमधून खेडोपाडी हा खेळ स्पर्धात्मक व मनोरंजानाच्या माध्यमातून खेळला जातो. यातूनच राज्यातील उस्मानाबाद, परभणी, संभाजीनगर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमधून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेले आहेत.

          सद्य:स्थिती राज्यामध्ये या खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनास्था, राज्य/ राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आवश्यक खेळाडूंची उंची, तसेच प्रशिक्षण व सरावाकडे दुर्लक्ष यामुळे या खेळाचे व खेळाडूंचे वलय कमी झालेले आहे. याचा निश्चितच तोटा खेळाडूंसोबतच राज्यालाही होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची होत असलेली पिछेहाट, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये, तसेच आयकर विभाग, रेल्वे, ओएनजीसी, सर्व्हिसेस इत्यादी ठिकाणी अतिशय अल्प प्रमाण असते किंवा दिसूनही येत नाहीत. यासाठी व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भवितव्याचा विचार करुनच खेळाडू शोध प्रक्रीयेतून १६ वर्षाखालील मुलांसाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकूल, पुणे येथे १७ ते ३० मे दरम्यान प्रस्तावित आहे. १७ मे २०२३ रोजी सिलेक्शन ट्रायल्सनंतर सुरू होईल. त्यामधुन २४ खेळाडूंची निवड करण्यात येईल. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.

          या प्रशिक्षण शिबिरासाठी पी. सी. पांडियन, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, तामिळनाडू यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. विविध स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी देखील उपलब्ध होऊ शकेल. खेळाडू हा १ जानेवारी २०२३ रोजी १७ वर्षाखालील असावा. खेळाडूंची उंची ६ फुट २ इंच असावे. शाळेत शिकत असलेला किंवा नसलेला अशा खेळाडूंचा शोध संबधित जिल्ह्यातून घेण्यात येणार आहे.

          जिल्ह्याच्या ठिकाणी गावपातळीपासून असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्थामधील खेळाडूंचा शोध घेऊन तसेच सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील खेळाडू या वयोगटामध्ये असल्यास व उंचीची अट पुर्ण करत असल्यास त्यांना या प्रशिक्षण शिबिरासाठी सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील खेळाडू निवड करतांना निव्वळ खेळाडूंच्या प्राविण्याचा विचार करुन व वरील दिलेल्या अटीनुसार जास्तीत जास्त पाच खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. (१ सेटर, २ अटॅकर, २ युनिर्व्हसल/ ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे/ खेळाडूंच्या खेळातील खेळण्याची जागा यानुसार असल्यास उत्तम या खेळाडू शोध मोहिमेसाठी कार्यालयातील कार्यरत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा अधिकारी, प्रशाला व संस्था यांचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

          १७ मे २०२३ पर्यंत खालील विहित नमून्यात माहिती dsysdesk13@gmail.com किंवा desk13.dsys-mh@gov.in या ईमेल वर पाठविण्यात यावी. खेळाडूचे संपुर्ण नाव, गावाचे नाव, जन्म दिनांक, आधारकार्ड क्रमांक

उंची, सेंमी., खेळण्याचे स्थान/ जागा, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीसह अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे