राजस्थान आर्य कॉलेज येथे 31 मे रोजी युवाशक्ती करीअर शिबीर



राजस्थान आर्य कॉलेज येथे

31 मे रोजी युवाशक्ती करीअर शिबीर

       वाशिम, दि. 24 (जिमाका) : कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईच्या विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशिमच्या वतीने राजस्थान आर्य कॉलेज येथे 31 मे रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात इयत्ता 10 वी आणि 12 वी, पदविका, पदवीनंतर युवक-युवतींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध रोजगाराच्या संधी, करीअर कसे निवडावे, व्यक्तीमत्व विकास तसेच स्पर्धा परीक्षेबाबत माहिती देण्यात येणार आहे.

          शिबीराचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड हे करतील. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खा. भावनाताई गवळी, खा. संजय धोत्रे, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, आ. धिरज लिंगाडे, आ. लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची उपस्थिती राहणार आहे.

          प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय तंत्र निकेतन, वाशिमचे प्राचार्य बी.जी. गवलवाड, करीअर अकॅडमीचे संचालक इस्माईल हयातखान पठाण, गायकवाड क्लासेसचे संचालक प्रा. गणेश गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी mahacareer.globalsapio.com या वेब लिंकवर नोंदणी करावी. असे आवाहन वाशिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांनी केले आहे.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे