1267 विद्यार्थ्यांनी घेतला स्वाधारचा लाभ
- Get link
- X
- Other Apps
1267 विद्यार्थ्यांनी घेतला स्वाधारचा लाभ
वाशिम, दि. 26 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहातील मर्यादित संख्येमुळे प्रवेश न मिळालेल्या/ शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी, 12 वी आणि इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुले-मुलींप्रमाणे भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरू केली आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्राप्त एकूण 1978 अर्जामधून सन 2022-23 वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या 724 तसेच सन 2022-23 मध्ये नुतनीकरणासाठी पात्र 543 विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती कार्यालयाकडून सहायक आयुक्त, समाज कल्याण वाशिम कार्यालयास प्राप्त निधी मधून सम प्रमाणात सन 2022-23 मध्ये एकूण 1267 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
स्वाधार योजनेकरीता सन 2022 -23 यावर्षात अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांमधून ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप त्रृटीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जातील त्रृटीची पुर्तता 10 दिवसाच्या आत कार्यालयात येऊन करावी.असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment