पालकमंत्री संजय राठोड १२ मे रोजी जिल्ह्यात
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री संजय राठोड १२ मे रोजी जिल्ह्यात
वाशिम दि.११ (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे शुक्रवारी १२ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी
१० : १५ वाजता शासकीय वाहनाने वाशिम येथील नवीन शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी १० : २५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व वाकाटक सभागृह येथे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा - २०२३ च्या बैठकीला उपस्थित राहतील.त्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाने अल्पसंख्यांक योजनांवर तयार केलेल्या " विकासाची दिशा " या पॉकेट बुक माहिती पुस्तिकेचे विमोचन करतील.सकाळी ११.३० शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी ११.४५ वाजता वाशिम तालुक्यातील सोनखासकडे प्रयाण करतील. सकाळी ११.५० वाजता सोनखास येथे आगमन व शहीद अमोल गोरे यांचे कुटुंबीयांचे सांत्वनपर भेट घेतील.त्यानंतर सोनखास येथून दिग्रसकडे प्रयाण करतील.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment