नियोजन भवन येथे1 जून रोजी नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळाश ेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन




नियोजन भवन येथे

1 जून रोजी नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळा

शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

       वाशिम, दि. 31 (जिमाका) : इंडिया फार्मर्स फर्टिलायझर को. ऑ. लिमिटेड (इफको) आणि कृषी विभाग, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 1 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे असतील. कार्यशाळेला इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे हे उपस्थित शेतकऱ्यांना नॅनो युरीया व नॅनो डीएपीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नॅनो खत वापर हे तंत्रज्ञान नवीन असल्याने याबाबत परिपुर्ण माहिती वितरक/क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांना नसल्याने हे तंत्रज्ञान माहिती अवगत करुन देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

           विभागातील इतर अधिकारी/कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती करुन घेण्याकरीता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सहायक कृषी अधिकारी यांच्या मार्फत The FarmBook युटयुब चॅलनव्दारे या कार्यशाळेचे थेट प्रसारण केले जाणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे