शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा




शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा

       वाशिम, दि. 26 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी ‘महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक योजनेच्या पुढील टप्प्यांतर्गत सौर कृषी पंपाकरिता महाऊर्जेच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

         शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनसुार ३,५ व ७.५ एच.पी.(डी.सी) क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येतात.

         या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थी हिस्सा पुढीलप्रमाणे असणार आहे. खुला (१० टक्के) ३ एचपी १९३८०रू,५ एचपी २६,९७५ रू, ७.५ एचपी ३७,४४० रू, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी  ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल. यात ३ एचपी ९,६९०,रू,  ५ एचपी १३,४८८ रू व ७.५ एचपी १८, ७२० रू आहे. 

       अर्ज ऑनलाईन सादर करताना त्यासोबत विहीर,कुपनलिका याची नोंद असलेला सातबारा,जमीन मालक एकापेक्षा जास्त असल्यास २०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नाहरकत पत्र,आधरकार्ड,छायाचित्र, पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.

          शेतक-यांना  महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B  या संकेतथळावर भेट देऊन या योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येतो.

        महाऊर्जामार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोट्यानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल.योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची सर्व माहिती महाऊर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट व फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये, तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृर्षी ऊर्जाअभियान पीएम कुसुम  घटक-ब योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन महासंचालक तसेच महाऊर्जा,प्रकल्प कार्यकारी अधिकारी  यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे