योजनांच्या लाभासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करा



योजनांच्या लाभासाठी

उत्पन्नाचा दाखला सादर करा

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांचा समावेश येतो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 20 ऑगस्ट 2009 नुसार माहे एप्रिल ते जून 2023 पर्यंत उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत नमुद केले आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी संजय गांधी योजना विभाग, तहसिल कार्यालय, वाशिम येथे विहीत कालावधीत उत्पन्नाचे दाखले स्वत: हजर राहून सादर करावे. विहीत कालावधीत लाभार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले प्राप्त न झाल्यास त्यांचे अनुदान बंद करण्यात येईल. ज्या तारखेला उत्पन्नाचा दाखला सादर केला जाईल, त्या तारखेपासून अर्थसहाय्य सुरु करण्यात येईल. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे