राष्ट्रीय लोकअदालतीत १४३५ प्रकरणांचा निपटारा १ कोटी ९७ लक्ष ६० हजार तडजोड रक्कम वसूल
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय लोकअदालतीत १४३५ प्रकरणांचा निपटारा
१ कोटी ९७ लक्ष ६० हजार तडजोड रक्कम वसूल
वाशिम,दि.०१ (जिमाका) जिल्हा व सत्र न्यायालय,वाशिम आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व न्यायालयात ३० एप्रील रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत १४३५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.या प्रकरणात १ कोटी ९७ लाख ६० हजार ६८१ रुपये तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.
जिल्हयातील न्यायालयामध्ये विशेष कलमांतर्गतची प्रकरणे निकाली काढण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात आली.यामध्ये जिल्हा तसेच तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या एकुण १०८१ प्रलंबीत व ३५४ दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व न्यायीक अधिकारी,वकील संघाचे सदस्य,जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment