मोटार वाहन समुच्चक नियमावली नागरीकांची मते व अभिप्राय मागविले




मोटार वाहन समुच्चक नियमावली

नागरीकांची मते व अभिप्राय मागविले

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : केंद्र शासनाने ओला, उबेर व इतर ॲग्रीगेटर्स कंपन्यांसाठी जारी केलेल्या ॲप आधरीत मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन ॲप आधारीत वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची बाब राज्य शासनाच्या कार्यवाहीखाली आहे. केंद्र शासनाच्या मार्गर्दाक सूचना www.morth.nic.in या संकेतस्ळावर नागरीकांसाठी उपलब्ध आहे. सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चक नियमावलीचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने समिती गठीत करण्यात आली आहे.

          तरी याविषयी ज्यांना आपले अभिप्राय/मत सादर करावयाचे असतील, त्यांनी आपले मत/अभिप्राय dycommr.enf1@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे प्रत्यक्षरित्या 20 मेपर्यंत सादर करावे. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेवून सूचना अंतिम करण्याविषयी शासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे