विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षणाचा समारोप
विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षणाचा समारोप
वाशिम,दि.४ (जिमाका) न्याय विभाग भारत सरकार,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम,यशदा पुणे आणि जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त वतीने नवीन आयुडीपी कॉलनी येथील कृषी विज्ञान केंद्र,विदाता भवन येथे दिशा अंतर्गत विधी साक्षरता व जागरूकता कार्यक्रमाअंतर्गत विधीदूतांचे क्षमता बांधणी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 2 ते 3 मे दरम्यान करण्यात आले.
3 मे रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सहायक लोक अभिरक्षक ऍड. शुभांगी खडसे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा व अन्य कायद्यांबाबत तर पी.एल.व्ही.प्रभू कांबळे यांनी वंचित घटकाकरीता असलेले कायदे,सहायक लोक अभिरक्षक ऍड.अतुल पंचवाटकर यांनी लोक अदालत,तंटा निवारण पद्धती,सहायक लोक अभिरक्षक ऍड. राहुल पुरोहित यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा व मोटर वाहन कायद्यांबाबत व विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी यांनी विधी सेवा प्राधिकरण एक शाश्वत विधी सहाय्य केंद्र या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मुख्य लोक अभिरक्षक ऍड.परमेश्वर शेळके व डॉ. देशमुख यांची उपस्थिती होती.यशदा पुणेकडून राज्यातील ४ विकासोन्मुख जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायत स्तरीय विधिदूत यांना विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षण दिले जाणार आहे.यशदाच्या विधी प्रशिक्षणाकरिता जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतचे सरपंच,बचत गटाच्या अध्यक्ष,बाल संरक्षण समितीच्या अध्यक्ष, सामुदायिक संसाधन व्यक्ती (सी. आर. पी) महिला व पुरुष या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या समारोपात महिलांनी मनोगत व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.संचालन प्रभू कांबळे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आला.
Comments
Post a Comment