Posts

Showing posts from September, 2019

प्रत्येक उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवा - नरेंदर सिंग

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         कारंजा येथील निवडणूक खर्च कक्षाला भेट वाशिम , दि. २९ : निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी विविध पथकांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या खर्चाची नोंद त्यांच्या शॅडो रजिस्टरमध्ये करावी, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी आज दिल्या. कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी कारंजा उपकोषागार कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाला भेट देवून तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे , सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, निवडणूक खर्च निरीक्षक श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. सिंग म्हणाले , विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जावू नये, यासाठी सर्व फिरत्या पथकांनी सतर्

निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांची राजगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट

Image
वाशिम , दि. २८ : निवडणूक रोकड, अवैध दारू तसेच शस्त्रास्त्रे यांची वाहतूक होवू नये, याकरिता जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापैकी वाशिम हिंगोली मार्गावर राजगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाला आज निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी भेट दिली. तसेच या पथकाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. यावेळी श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार उपस्थित होते. श्री. सिंग म्हणाले, स्थिर सर्वेक्षण पथकातील प्रत्येक व्यक्तीने जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत रोकड, अवैध दारू, शस्त्रे अथवा इतर संशयास्पद वस्तूची वाहतूक होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच वाहनांची तपासणी करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग जिल्ह्यात दाखल

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ वाशिम ,   दि .   २७   :   विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांकरिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नरेंदर सिंग यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ते आज जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांची भेट घेवून त्यांनी निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन , उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव , निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे , श्याम गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथील काटेपुर्णा कक्षामध्ये येथे सोयीनुसार नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७८२०८८०६०१असा आहे. या क्रमांकावर नागरिक निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्क साधू शकतात , असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

Image
·         कुटुंबातील व परिसरातील मतदारांना करणार आवाहन ·         ‘स्वीप’अंतर्गत सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथ वाशिम, दि. २५ : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृतीविषयक उपक्रमांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सुध्दा सहभागी होत आहेत. त्यानुसार आज जिल्ह्यातील विविध विद्यालये, महाविद्यालयांमधील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थींनी मतदार जागृतीसाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. मतदारांना आपल्या मताचे महत्व पटवून देण्यासाठी ‘स्वीप’ समितीमार्फत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून या विद्यार्थ्याचे पालक व कुटुंबातील इतर मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. याकरिता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम व स्

निवडणूक विषयक विविध बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
·         मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना वाशिम, दि. २५ : विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून यादिवसापासूनच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली पूर्वतयारी आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, वाशिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, रिसोड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, तहसीलदार

‘पेड न्यूज’वर विशेष लक्ष ठेवा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची सभा वाशिम, दि. २५ : निवडणूक काळात उमेदवारांकडून प्रचारासाठी पेड न्यूजचा आधार घेतला जाण्याची शक्यता असते. अशा पेड न्यूजमुळे मतदारांवर प्रभाव पडतो. त्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम व प्रमाणीकरण समितीच्या सदस्यांनी पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, वाशिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, रिसोड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. व्ही. वाढवे, सोशल मिडिया तज्ज्ञ प्रा. मंगेश हुले, प्रा. गजानन वाघ, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पेड न्यूज आढळून आल्यास संबंधित उ

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·          मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण वाशिम ,   दि .   २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणाहून जिह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी रमेश काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, नायब तहसीलदार प्रकाश डाहोरे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदानयंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या १२६ टक्के बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १३० टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार वाशिम येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा

निवडणूक खर्चाची माहिती विहित कालमर्यादेत सादर करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक ·         निवडणूक विषयक विविध बाबींच्या दरनिश्चिती वाशिम, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लक्ष रुपयेपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. सर्व उमेदवारांनी या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा, तसेच निवडणूक खर्चाची माहिती विहित नमुन्यात व निश्चित कालमर्यादेत निवडणूक यंत्रणेला सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्थायी समितीच्या सभेत ते बोलत होते. निवडणूक विषयक विविध बाबींच्या दरनिश्चितीसाठी व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी दिनेशचंद्र वानखडे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन , वाशिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अध

मतदान केंद्रांवर नियुक्तीसाठी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण पूर्ण

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ वाशिम, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे व माहिती संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत एनआयसीच्या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे मतदान केंद्रांवर नियुक्तीसाठी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी प्रशांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जिल्ह्यातून एकूण ८ हजार १३१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती एनआयसीच्या प्रणालीवर अपलोड करण्यात आली. यापैकी रिसोड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील २ हजार ५५२, वाशिम विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील ३ हजार १६२

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पथके तैनात - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
   ·         जिल्हा संपर्क कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन ·         मतदार यादीत नाव नोंदविण्याच अजूनही संधी ·         ‘सी व्हीजील’द्वारे करता येणार ऑनलाईन तक्रार वाशिम , दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, विधान्साभास सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून ४ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ५ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोंबर पर्यं

निवडणूक काळात सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक वाशिम , दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व शासकीय विभागांनी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने   काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित   सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवन संरक्षक सुमंत सोलंकी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख व निवडणूक विषयक नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले , भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार २१ ऑक्टोंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन , शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शा