जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा



सातवी आर्थिक गणना

वाशिम, दि. ०५ : केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत घेतला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज. भा. आढाव, सामुहिक सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम सामुहिक सेवा केंद्रांमार्फत नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून करण्यात येणार आहे. हे प्रगणक प्रत्येक उद्योग व कुटुंबाला भेट देवून  मोबाईल अॅपच्या सहाय्याने माहिती गोळा करणार आहेत. ही माहिती तपासणीची जबाबदारी सामुहिक सुविधा केंद्रामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षकांवर आहे. जिल्ह्यात शहरी भागात ६७ प्रगणक व ११ पर्यवेक्षक तसेच ग्रामीण भागात १०६१ प्रगणक व ४९१ पर्यवेक्षक यांची नियुक्त करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, आर्थिक गणनेचे काम विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच विहित मुदतीच्या आतच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून संकलित करण्यात आलेल्या माहितीची तपासणी करण्यात यावी. सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल जिल्हास्तरावर उपलब्ध करावा. जेणेकरून संनियंत्रण करणे शक्य होईल.
प्रारंभी श्री. आढाव यांनी आर्थिक गणनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश