निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग जिल्ह्यात दाखल
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक २०१९
वाशिम, दि. २७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता जिल्ह्यातील
तीनही विधानसभा मतदारसंघांकरिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नरेंदर सिंग यांची
भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ते आज जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांची भेट घेवून त्यांनी निवडणूक खर्च
संनियंत्रणासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली.
यावेळी
उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन,
उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, निवडणूक खर्च
संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, श्याम
गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक
खर्च निरीक्षक नरेंदर सिंग हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथील काटेपुर्णा
कक्षामध्ये येथे सोयीनुसार नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा
भ्रमणध्वनी क्रमांक ७८२०८८०६०१असा आहे. या क्रमांकावर नागरिक निवडणूक खर्च
निरीक्षक यांच्याशी संपर्क साधू शकतात,
असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
Comments
Post a Comment