‘पेड न्यूज’वर विशेष लक्ष ठेवा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
·
माध्यम
प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची सभा
वाशिम,
दि. २५ : निवडणूक
काळात उमेदवारांकडून प्रचारासाठी पेड न्यूजचा आधार घेतला जाण्याची शक्यता असते.
अशा पेड न्यूजमुळे मतदारांवर प्रभाव पडतो. त्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम व
प्रमाणीकरण समितीच्या सदस्यांनी पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व
संनियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी
अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, वाशिम
विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, रिसोड विधानसभा मतदारसंघाचे
निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय
अधिकारी अनुप खांडे, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. व्ही. वाढवे, सोशल
मिडिया तज्ज्ञ प्रा. मंगेश हुले, प्रा. गजानन वाघ, जिल्हा माहिती कार्यालयाचे
तानाजी घोलप आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. मोडक म्हणाले, पेड न्यूज आढळून आल्यास संबंधित
उमेदवारांना तात्काळ नोटीस देवून त्यांचा खुलासा मागवावा. तसेच वृत्त वाहिन्यांवरील
बातम्यांवर सुद्धा लक्ष ठेवावे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी दूरचित्रवाणी वाहिन्या, सोशल मीडिया, आकाशवाणी व खाजगी
रेडीओ, बल्क एस. एम. एस., मोबाईल व्हॅन यासारख्या दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित
होणाऱ्या प्रचाराच्या सर्व जाहिराती, तसेच वृत्तपत्रांमधून मतदानापूर्वी शेवटच्या
४८ तासात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण
समितीकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी
सुद्धा अशा प्रकारे प्रमाणित न केलेल्या जाहिरातींचे प्रसारण करू नये.
उमेदवारांनी
करावयाच्या जाहिरातीमधील मजकूर राष्ट्रीय एकात्मता,
धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा असू नये.
वैयक्तिक टीका टिपणी करू नये. महिलांचे व बालकांचे विकृत चित्रण असू नये, गुन्हेगारीचे
उदात्तीकरण, भारतीय घटनेचा अवमान यासाठी प्रतिबंध आहे. जाहिरात प्रमाणिकरणासाठी राजकीय पक्ष
आणि उमेदवारांनी जिल्हास्तरीय प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे विहित
नमुन्यात अर्ज करावा. द्याव्यात. त्यासाठीचा विहित नमुना जिल्हाधिकारी कार्यालयात
स्थापन करण्यात आलेल्या प्रसारमाध्यम कक्षाकडे उपलब्ध आहे. सदर विहित नमुन्यात जाहिरातीच्या
स्क्रिप्ट, जाहिरात तयार करण्याचा व प्रसारणाच्या खर्चासाहित विहित कालावधीत सादर करावा,
असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment