Posts

Showing posts from January, 2023

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनातालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

Image
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न  वाशिम दि.३१ (जिमाका) आत्मा कार्यालय,वाशिम येथे तालुका कृषि अधिकारी,वाशिम कार्यालयाच्या वतीने आज ३१ जानेवारी रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार  यांनी केले.           कार्यशाळेला मार्गदर्शन करताना श्री.तोटवार यांनी सूक्ष्म अन्नप्रक्रिया यावर आधारित उद्योग धंद्याचे महत्त्व तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये शेतकरी शेतमजूर तरुण बेरोजगार यांना असलेली संधी व त्या संधीचे सोने करण्याकरीता या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घेण्याचे आवाहन केले.            प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र,करडा येथील कार्यक्रम सहायक श्रीमती शुभांगी वाटाणे यांनी विविध प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन केले.जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ यांनी  योजना राबविण्याचे अनुषंगाने विविध तांत्रिक बाबी व योजनेच्या लाभार्थींनी करावयाच्या सुधारणांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.               जिल्ह

समाज कल्याण विभागाच्या विभागीयस्तरीय कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
समाज कल्याण विभागाच्या विभागीयस्तरीय कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  समाज कल्याण विभागाच्या विभागीयस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे 28 जानेवारी 2023 रोजी अमरावती विभागाचे  समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री सुनिल वारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, अमरावती समाज कल्याण आयुक्त माया केदार, बुलडाणा समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड, बुलढाणा व अकोला समाज कल्याण आयुक्त राजेंद्र जाधव व समाज कल्याण अधिकारी यांची उपस्थिती होती.           कार्यक्रमाचे संयोजक समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुरकुंडी येथील शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक ए.आर.भगत यांनी कला व क्रीडा अविष्कार स्पर्धाबाबत प्रास्ताविक केले.            श्री.वारे आपल्या अध्यक्षीय मार

रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Image
रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न       वाशिम, दि. 30 (जिमाका) :  रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालय, वाशिम यांच्यावतीने आज 30 जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.संजय देशपांडे, जिल्हा रुग्णालयातील डॉ.श्री.मोरे, वैद्यकीय अधिकारी कुष्ठरोग डॉ.मिलींद जाधव, अँथेलेटिक असोसिएशनचे प्रतिनिधी चेतन शेंडे व ज्ञानेश्वर लाळगे, कुष्ठरोग व क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास ९४ मुलामुलींचा सहभाग होता.          रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. या रन फॉर लेप्रसी स्पर्धेत विजेत्या मुले व मुलींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक, प्रमाणपत्र, मानचिन्ह रोख बक्षीस मान्यवरांच्

पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्ह्यात 54.80 टक्के मतदान9 हजार 891 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Image
पदवीधर मतदार संघ निवडणूक  जिल्ह्यात 54.80 टक्के मतदान 9 हजार 891 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क  वाशिम दि.30 (जिमाका) अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 30 जानेवारी रोजी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 26 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान झाले.जिल्ह्यातील एकूण 18 हजार 50 मतदारांपैकी 9 हजार 891 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी 54.80 टक्के इतकी आहे.सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीतील 23 उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंद झाले.           वाशिम तालुक्यातील 2 हजार 346 पुरुष आणि 733 स्त्री असे एकूण 3 हजार 79 मतदार, मालेगाव तालुक्यातील 875 पुरुष आणि 149 स्त्री असे एकूण 1 हजार 24 मतदार, रिसोड तालुक्यातील 1 हजार 418 पुरुष आणि 285 स्त्री आणि एक इतर अशा एकूण 1 हजार 704 मतदार,मंगरूळपीर तालुक्यातील 1 हजार 39 पुरुष आणि 276 स्त्री अशा एकूण 1 हजार 315 मतदार, कारंजा तालुक्यातील 1 हजार 548 आणि 627 स्त्री अशा एकूण 2 हजार 175 आणि मानोरा तालुक्यातील 474 पुरुष आणि 120 स्त्री अशा एकूण 594 म

पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण वाशिम, दि. 26 (जिमाका) :  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  73  व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम. अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी परेडचे निरीक्षण केले.   वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक ,  होमगार्ड पुरुष व महिला दल ,  बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी पथक , सुपखेला येथील  यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी ,  नवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक , सुरकंडी येथील मुलींचे निवासी शाळेचे पथक, जिल्हा परिषद शाळेचे पथक,  पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल, पोलीस दल श्वान पथक, पोलीस बॉम

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण

Image
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण       वाशिम, दि. 26 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम, अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले. *******

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकव ोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध

Image
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात एकूण 26 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. पदवीधर निवडणूकीमध्ये मतदान करण्याकरीता मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याबाबतची माहिती  https://ceoelection. maharashtra.gov.in/gtsearch/  या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी मतदारांनी आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी वरील लिंकचा वापर करावा. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक आधिकारी, वाशिम यांनी केले आहे.  *******

30 जानेवारीला जिल्हा रुग्णालयातून रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

Image
30 जानेवारीला जिल्हा रुग्णालयातून रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन 30 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अकोला नाका, वाशिम येथून करण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत 16 वर्षावरील मुला-मुलींना सहभागी होता येईल. माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक (महिला व पुरुष), कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासनाचे विविध विभाग, खेळाडू, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. स्पर्श कुष्ठरोग अभियानाअंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य “ कुष्ठरोगाविरोधात लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात ” असे आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यांना पारितोषिक देण्यात येईल. असे आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक, वाशिम यांनी कळविले आहे.     *******

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण

Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे सकाळी ९:१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता प्रजासत्ताक दिनाचा हा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून आणि मास्क संदर्भातील सर्व नियम पाळण्याची उपस्थितांनी दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. *******

13 वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार

Image
13  वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने आज 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सभागृहात उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्राच्या अंध कलावंतांनी देशभक्ती गीत सादर करुन उपस्थितांकडून टाळयांची दाद घेतली. शाहिर संतोष खडसे व त्यांच्या सहकारी कलावंतांनी मतदार प्रबोधन गीत सादर केले.         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम., अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, ज्येष्ठ साहित्यिक पदमश्री नामदेव कांबळे व

युवती व महिलांसाठी ब्युटीपार्लर प्रशिक्षण 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

Image
युवती व महिलांसाठी ब्युटीपार्लर प्रशिक्षण 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, वाशिम येथे  सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सन  २०२२-२३  अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस) यावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.          सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार व रोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाच्या आयोजना मागील मुख्य उद्देश आहे. ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेवनेस) प्रशिक्षण कार्यक्रमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना ब्युटीशियनचे व्यक्तिमत्व, हेअर अँड स्कीन केअर ज्यामध्ये हेअर कट, हेअर स्टाईल, हेअर वाश, हेड मसाज, मेहंदी थ्रेडिंग, व्हॅक्सिंग, फेशिअल, मेनिक्युअर, पेडीक्युअर, ब्लीच, फेस क्लीनअप व मेकअप आदी विषयी थेअरी व प्रात्याक्षीक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय उद्योजकता विकास प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद

पदवीधर मतदारसंघ निवडणूकमत कसे नोंदवाल ? निवडणूक आयोगाच्या सूचनापहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक

Image
पदवीधर मतदारसंघ निवडणूक मत कसे नोंदवाल ? निवडणूक आयोगाच्या सूचना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक        वाशिम, दि. 17 (जिमाका) :  पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान पद्धतीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे कार्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.           मतदान करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये. आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘ १’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.          आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात

निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी

Image
निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी  वाशिम दि.१५ (जिमाका) भारत निवडणूक आयोगाने अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरीता नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार यांनी आज १५ जानेवारी रोजी वाशिम शहरातील सिव्हील लाईन भागातील नगर परिषदेच्या राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे असलेल्या तीन मतदान केंद्रांना,लायन्स विद्या निकेतन येथील तीन केंद्रांना आणि मालेगाव तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांचे कक्षातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व मालेगाव तहसीलदार रवी काळे प्रामुख्याने उपस्थित होते.                मतदान केंद्राची पाहणी करताना श्री पंकज कुमार यांनी काही उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृहाची देखील उपलब्धता असावी तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करण्यास जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था असावी. मतदान केंद्राबाबत मतदारांच्या

पदवीधर मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे श्री पंकजकुमार

Image
पदवीधर मतदारसंघ निवडणूक  आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे                            श्री पंकजकुमार  वाशिम दि.14 (जिमाका) येत्या 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. असे निर्देश निवडणूक निरीक्षक श्री.पंकजकुमार यांनी दिले.           आज १४ जानेवारी रोजी श्री. पंकजकुमार यांनी निवडणूक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतला.यावेळी ते बोलत होते.सभेला अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार विजय साळवे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.          श्री पंकजकुमार म्हणाले, प्रत्येक मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था असावी.दिव्यांग मतदारांसाठी रॅमची देखील व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांच्या व म

मौजे कृष्णा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा

Image
मौजे कृष्णा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा   वाशिम दि.१४ (जिमाका) आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रमातंर्गत वाशिम तालुक्यातील मौजा कृष्णा येथे आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील आहार तज्ञ सुनीता लाहोरे,कृष्णाचे सरपंच श्री राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आहेर, तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ,तालुका कृषी अधिकारी श्री.उमेश राठोड,कृषी पर्यवेक्षक नितीन उलेमाले,श्री. वाळूकर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक. जे.पी.लव्हाळे,कृषी सहाय्यक पंकज उलेमाले,अनिल जयताडे,देवेंद्र गवई,संजय कुटे व गावातील ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष शेतकरी व शेतमजूर बहुसंख्येने उपस्थित होते.

आदिवासी मुलींचे वसतिगृहात स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Image
आदिवासी मुलींचे वसतिगृहात स्वामी विवेकानंद जयंती साजरी  वाशिम; दि.१३(जिमाका) १२ जानेवारी २०२३ या रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करून राष्ट्रीय युवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली स्वामी विवेकानंद जयंती आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह क्र.२ वाशिम येथे साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी गृहपाल अनुराधा बिसने ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार राऊत होते. युवकांसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पिरामल फाउंडेशनचे पौशीता दत्ता, पियुष रंजन,दिगांबर घोडके, व गांधी फेलो आशा गुप्ता,कौशल्या विश्वकर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरुवात केली.       नेहरू युवा केंद्र वाशिम यांच्या वतीने दि १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२३ पर्यंत युवा साप्ताह साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद याची जयंती साजरी करण्यात आली.         श्रीमती बिसने यांनी युवकांचे प्रेरणास्

चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप

Image
चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप       वाशिम, दि. 13 (जिमाका) : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन 11 जानेवारी ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे करण्यात आले. बालकांचा आनंद व्दिगुणित करण्याकरीता आणि बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बालकांचा क्रीडात्मक विकास व्हावा, यादृष्टीने, कबड्डी, धावणे, गोळा फेक, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा आर. बी. सोरेकर यांनी केले. यावेळी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. अनिल उंडाळ, डॉ. मंजुषा जांभरूणकर व बालाजी गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.           12 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक क

शेलूबाजार माध्यमिक आश्रमशाळेत स्नेहगंध 2023 कार्यक्रम संपन्न

Image
       शेलूबाजार माध्यमिक आश्रमशाळेत     स्नेहगंध 2023 कार्यक्रम संपन्न                                                                          वाशिम, दि. 13 (जिमाका) :  शेलूबाजर येथील आदिवासी विकास विभागाच्या माध्यमिक आश्रमशाळेत स्नेहगंध 2023 या कार्यक्रमाअंतर्गत विज्ञान, गणित, चित्रकला, रांगोळी व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन 11 जानेवारी रोजी करण्यात आले. उदघाटन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले. अध्यक्षस्थानी अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.           उदघाटक म्हणून बोलतांना श्री. वानखेडे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेमध्ये शिकत असतांना आपल्या जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा. केवळ शिक्षण यावरच लक्ष केंद्रीत करुन भविष्यात आपल्याला चांगल्या मोठया पदावर कसे जाता येईल. यादृष्टीने अभ्यासासोबतच स्पर्धा परिक्षेचे आतापासूनच तयारी ठेवावी. शिक्षकांकडून जास्तीत जास्‍त ज्ञान गृहण करावे. शालेय जीवनात

वाहतूक नियमाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य शहाजी पवार 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ

Image
वाहतूक नियमाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य                                           शहाजी पवार 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ       वाशिम, दि. 13 (जिमाका) : सुरक्षितता हा जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. प्रत्येक नागरीकाने सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले.          उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज 13 जानेवारी रोजी 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान - 2023 चे उदघाटन श्री. पवार यांनी केले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे व सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.          श्री. पवार म्हणाले, अपघात झाला की, आपण सगळे हळहळतो, कधी कधी अपघात आपल्याच कोणाच्या तरी घरात मान

खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून खेळावे शहाजी पवार भूमि अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे उदघाटन

Image
खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून खेळावे                                                        शहाजी पवार भूमि अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे उदघाटन        वाशिम, दि. 12 (जिमाका) :  खेळामुळे कामाचा ताणतणाव दूर होण्यास मदत होते. खेळामुळे आरोग्य निरोगी राहते आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो. खेळाडूंनी पंचाचा निर्णय मान्य करुन खेळाडूवृत्ती जोपासून खेळावे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले.             आज जिल्हा क्रीडा संकुल येथे भूमि अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे उदघाटन श्री. पवार यांनी केले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक विलास शिरोळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खिरेकर, विदर्भ लँड रेकॉर्ड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष गजानन इंगळे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष नितीन इंगोले, यवतमाळचे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवदास गुंड, बुलडाणाचे प्रभारी जिल्हा अधिक्षक भू

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक आदर्श आचार संहितेची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी शहाजी पवार

Image
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक आदर्श आचार संहितेची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी                                                                                 शहाजी पवार        वाशिम, दि. 12 (जिमाका) :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ अमरावती विभाग निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 29 डिसेंबर 2022 पासून या निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देश आदर्श आचार संहितेचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी दिले.           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हयातील यंत्रणांची या अनुषंगाने आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.           आचार संहितेच्या काळात काय करावे काय करु नये याबाबतच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. आचार संहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे नविन प्रकल्प, कार्यक्रम, कोणत्याही स्वरुपातील सवलती किंवा वित्तीय अनुदाने घोषित करण्यास

आपत्ती व्यवस्थापन विषयक आयआरएस ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

Image
आपत्ती व्यवस्थापन विषयक आयआरएस ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न        वाशिम, दि. 12 (जिमाका) :  आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम यांच्या संयुक्त वतीने IRS online प्रशिक्षण सावरगाव (बर्डे) येथील सन्मती इजिनियरींग कॉलेज येथे 10 जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले.           प्रशिक्षणाला मास्टर ट्रेनर म्हणून अतनु घोष, ब्रिजेश शर्मा, आकाश लाड, वाशिम तहसिलचे नायब तहसिलदार श्रीमती पुरोहित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रशिक्षणाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, महसूल, पोलिस, पंचायत, नगरपरिषद, आरोग्य, वन विभाग, अग्निशमन, शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे, लघु सिंचन, मृद व जलसंधारण, बांधकाम जिल्हा परिषद, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुरवठा, महावितरण, तहसील कार्यालय, कृषी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील ८९ अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणास उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्व

चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ

Image
चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ        वाशिम, दि. 11 (जिमाका) :  अनाथ, निराधार, उन्मार्गी मुले आणि इतर बालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना चालना देण्यासोबतच त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी वाशिम येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, नालंदा नगर, येथे आज 11 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आले आहे.            बाल महोत्सवाचे उदघाटन बाल न्याय मंडळाचे अध्यक्षा श्रीमती आर.बी. सोरेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) राजेंद्र शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, सहायक लेखाधिकारी अलिशा भगत, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. अनिल उंडाळ, डॉ. मंजुश्री जांभरुणकर व बालाजी गंगावणे यांची उपस्थिती होती.           यावेळी मान्यवरांनी चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त केले. बालकांनी या बाल

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न**महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे**शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश**

Image
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) *मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न* *महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश* मुंबई, दि. ११ जानेवारी- राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यावेळी उपस्थि