निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी

निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी 

वाशिम दि.१५ (जिमाका) भारत निवडणूक आयोगाने अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरीता नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार यांनी आज १५ जानेवारी रोजी वाशिम शहरातील सिव्हील लाईन भागातील नगर परिषदेच्या राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे असलेल्या तीन मतदान केंद्रांना,लायन्स विद्या निकेतन येथील तीन केंद्रांना आणि मालेगाव तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांचे कक्षातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व मालेगाव तहसीलदार रवी काळे प्रामुख्याने उपस्थित होते.   
            मतदान केंद्राची पाहणी करताना श्री पंकज कुमार यांनी काही उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृहाची देखील उपलब्धता असावी तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करण्यास जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था असावी. मतदान केंद्राबाबत मतदारांच्या तक्रारी येणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे श्री. पंकज कुमार यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश