पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्ह्यात 54.80 टक्के मतदान9 हजार 891 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

पदवीधर मतदार संघ निवडणूक 

जिल्ह्यात 54.80 टक्के मतदान
9 हजार 891 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 

वाशिम दि.30 (जिमाका) अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 30 जानेवारी रोजी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 26 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान झाले.जिल्ह्यातील एकूण 18 हजार 50 मतदारांपैकी 9 हजार 891 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी 54.80 टक्के इतकी आहे.सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीतील 23 उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंद झाले. 
         वाशिम तालुक्यातील 2 हजार 346 पुरुष आणि 733 स्त्री असे एकूण 3 हजार 79 मतदार, मालेगाव तालुक्यातील 875 पुरुष आणि 149 स्त्री असे एकूण 1 हजार 24 मतदार, रिसोड तालुक्यातील 1 हजार 418 पुरुष आणि 285 स्त्री आणि एक इतर अशा एकूण 1 हजार 704 मतदार,मंगरूळपीर तालुक्यातील 1 हजार 39 पुरुष आणि 276 स्त्री अशा एकूण 1 हजार 315 मतदार, कारंजा तालुक्यातील 1 हजार 548 आणि 627 स्त्री अशा एकूण 2 हजार 175 आणि मानोरा तालुक्यातील 474 पुरुष आणि 120 स्त्री अशा एकूण 594 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
            तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.वाशिम तालुका - 51.71 टक्के,मालेगाव तालुका - 59.05 टक्के,रिसोड तालुका - 58.94 टक्के, मंगरूळपीर तालुका - 57.15 टक्के,कारंजा तालुका - 54.10 टक्के आणि  मानोरा तालुका - 51.65 अशी आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश