आदिवासी मुलींचे वसतिगृहात स्वामी विवेकानंद जयंती साजरी


आदिवासी मुलींचे वसतिगृहात
स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 वाशिम; दि.१३(जिमाका) १२ जानेवारी २०२३ या रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करून राष्ट्रीय युवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली स्वामी विवेकानंद जयंती आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह क्र.२ वाशिम येथे साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी गृहपाल अनुराधा बिसने ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार राऊत होते. युवकांसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पिरामल फाउंडेशनचे पौशीता दत्ता, पियुष रंजन,दिगांबर घोडके, व गांधी फेलो आशा गुप्ता,कौशल्या विश्वकर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरुवात केली. 
     नेहरू युवा केंद्र वाशिम यांच्या वतीने दि १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२३ पर्यंत युवा साप्ताह साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद याची जयंती साजरी करण्यात आली. 
       श्रीमती बिसने यांनी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जीवनशैली व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल युवतीना माहिती दिली. सर्व जगाला मानवजातीच्या सेवेचा संदेश देणारे एक थोर विचारवंत आधुनिक भारतात होऊन गेले. त्यांचे नाव स्वामी विवेकानंद.ते लहानपणापासूनच हुशार होते.त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती.स्वामी विवेकानंद एक चांगले वक्तेही होते. स्वामी विवेकानंद यांनी या देशातील तरुणांना उठा जागे व्हा आणि आपले ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका.असा उद्देश केला.
         प्रमुख अतिथी श्री.राऊत यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,देशाने माझ्यासाठी काय केले, असे म्हणण्यापेक्षा मी देशासाठी काय करेन याचा विचार केला पाहिजे. सध्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नवनवीन उद्योगधंदे आधुनिक शेतीसाठी पावले उचलावीत. इतर राष्ट्रातील लोक भारतात येऊन धंद्यात प्रगती करत आहेत.आपणही आपले शिक्षण फक्त नोकरीसाठी आहे हे विसरून ते कल्पक बुद्धीने शेती आणि धंद्यासाठी वापरावे आणि आपले कर्तृत्व उभे करावे.याच्या सहायाने राष्ट्रीय विकासामध्ये नकळत युवकांचा हातभार लागेल.असे सांगितले.
            प्रमुख मार्गदर्शक म्हणून पिरामल फाउंडेशनच्या पौशीता दत्ता यांनी युवकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या तसेच अडीअडचणीवर चर्चा करून सकारात्मक दृष्टीकोनाने कशाप्रकारे कार्य केले पाहिजे असे योग्यप्रकारे मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य केले. तसेच नेहरू युवा केंद्र वाशिमचे युवा स्वयंसेवक हेमंत सावळे, अशांत कोकाटे, दत्ता मोहळे, अर्चना मुंढे, प्रियंका इढोळे यांनी सुद्धा नेहरू युवा केंद्र संगठन व राष्ट्रीय युवा सप्ताह बद्दल माहिती देऊन त्यांच्या मार्फत युवकांसाठी कोणकोणते कार्यक्रम राबविण्यात येतात यांची सुद्धा सविस्तर माहित दिली.या सप्ताहामध्ये युवकांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश