चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ



चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ

       वाशिम, दि. 11 (जिमाका) : अनाथ, निराधार, उन्मार्गी मुले आणि इतर बालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना चालना देण्यासोबतच त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी वाशिम येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, नालंदा नगर, येथे आज 11 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आले आहे.

           बाल महोत्सवाचे उदघाटन बाल न्याय मंडळाचे अध्यक्षा श्रीमती आर.बी. सोरेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) राजेंद्र शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, सहायक लेखाधिकारी अलिशा भगत, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. अनिल उंडाळ, डॉ. मंजुश्री जांभरुणकर व बालाजी गंगावणे यांची उपस्थिती होती.

          यावेळी मान्यवरांनी चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त केले. बालकांनी या बाल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडा व कला गुण प्रदर्शित करावे आणि भविष्यात विविध क्षेत्रात नावलौकीक करावा. अशा शुभेच्छा या प्रसंगी दिल्या. कार्यक्रमाला बालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक अनिता काळे यांनी केले. आभार परिविक्षा अधिकारी गजानन पडघान यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश